रुपाली डोंगरे चित्रा न्युज
छत्रपती संभाजीनगर:-ईव्हीएम हॅक करतो म्हणत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्याकडे अडीच कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी पुण्यातून एकाला अटक करण्यात आली आहे.
आरोपीला एक लाख रुपये घेताना रंगेहात पकडण्यात आलं आहे. अंबादास दानवे यांच्या भावाने सापळा रचत हा प्रकार उघडकीस आणला आहे. मारुती ढाकणे असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.
अंबादास दानवेंच्या भावाने सापळा रचला
मारुती ढाकणे असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील राहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात जेवढे एव्हिएम आहेत, ते सर्व हॅक करुन तुम्हाला हवा तसा निकाल देतो, असे आश्वासन देत अंबादास दानवेंना फोन केला. त्यासाठी अडिच कोटी रुपये दानवे यांच्याकडे मागण्यात आले. या संदर्भात दानवेंना संशय आणल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलीसांनी सापळा रचत अंबादास दानवे यांच्याकडे पैसे दिले. पुण्यातील एका हॉटेलमध्ये मारुती ढाकणेला पैसे घेताना रंगेहात पकडले आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणी ताब्यात घेतले आहे.
आरोपीकडून संभाजीनगरमध्ये मदत करण्याचे आश्वासन
अंबादास दानवे यांच्या अडिच कोटींची मागणी करताना आरोपीने संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. ईव्हिएम हॅक करुन तुम्हाला संभाजीनगरमध्ये पाहिजे तो रिजल्ट मिळवून देऊ, असं आरोपीने अंबादास दानवे यांना सांगितले. त्यानंतर दानवेंनी पोलिसांना फोन करत याबाबतची माहिती दिली. त्यानंतर सापळा रचत पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं आहे.


0 टिप्पण्या