सुजित धनवे चित्रा न्युज
अहमदनगर :- जामखेड तालुक्यातील मुंगेवाडी येथील महिला संगीता बाळासाहेब भोसले मागील तीन चार वर्षां पूर्वी प्रसूतीच्या वेळेला कोमात गेली होती.
त्यामुळे घरातील घरपण हरवले होते.
स्थानिक कार्यकर्ते व भाजपाचे पदाधिकारी यांनी भोसले कुटुंबाला धीर दिला जगण्याचे बळ दिले.मृत्यूशी झुंज देत पत्नीची त्यांच्या पतीने सेवा केली .
परिस्थिती बिकट असताना त्यांची लहान मुलासारखी काळजी घेत खूप औषध उपचार करून वेळोवेळी हॉस्पिटल मध्ये नेहून उपचार केले होते . गेल्या वर्षीपासून त्यांच्या थोडी सुधारणा झाली होती. ईश्वर कृपेने त्यांचे हात पाय हलू लागले आपण जे बोलतो त्यांना ते कळायला लागले. भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र सुरवसे, नानासाहेब गोपाळघरे व स्थानिक सामाजिक कार्यकर्ते यांनी
आमदार प्रा.राम शिंदे यांना माहिती दिली. व या कुटुंबाला मदतीचा हात दिला. सदरील गरीब कुटुंब आहे हॉस्पिटल मध्ये खर्च करण्याची परिस्थिती नाही तेव्हा आमदार प्रा.राम शिंदे यांनीही या कुटुंबाला वेळोवेळी मदत केली. भोसले कुटुंबाचे पालकत्व स्वीकारल्या प्रमाणे सर्वांनी सहकार्य केल्या मुळेच आज भोसले कुटुंब आयुष्यात पुन्हा एकदा जगण्याची नवी प्रेरणा घेऊन उभे राहिले.
सदर महिलेच्या तब्येतीत सुधारणाही झाली आणि नुकत्याच झालेल्या 13 तारखेच्या लोकसभेच्या मतदानाच्या दिवशी त्यांनी मतदान करायचे ठरवले. व्हील चेअर बसून त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला हा आनंद खूप मोठा होता.
देश हितासाठी सर्वांनी मतदान करणे देश हितासाठी किती महत्वाचे आहे हा संदेश त्यांनी दिला. नागोबाची वाडी, मुंगे वाडी, खर्डा व परिसरातील सर्वांनी तिचे कौतुक केले.


0 टिप्पण्या