Ticker

6/recent/ticker-posts

दुधाने अंघोळ करत शेतकऱ्यांकडून दरवाढीची मागणी


राकेश आसोले चित्रा न्युज 
छत्रपती संभाजीनगर :-जिल्ह्यातील आडगाव बुद्रुक येथे गुरुवारी सकाळी दुधाने अंघोळ करत निषेध आंदोलन करण्यात आले. दुधाला ४० रुपये हमीभाव देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. या आंदोलनामुळे पुन्हा एकदा दूध दरवाढीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या आंदोलनामुळे पुढील काही वेळ संपूर्ण रस्त्यावर दुधाचे पाट वाहत असल्याचे चित्र दिसले. तर काही वेळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता. दरम्यान  सध्या असलेल्या २५ रुपये भावात उत्पादन खर्च निघत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. गाय, म्हैस यांचा चारा व संगोपन खर्च अधिक आहे. सरकारकडे वारंवार मागणी करून देखील काहीच थोस निर्णय घेतला जात नाही, हि खेदाची बाब आहे. त्यामुळे अखेर आंदोलन करावे लागत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. येत्या आठ दिवसात दुधाच्या दरात वाढ न केल्यास जिल्ह्यात येणाऱ्या सर्व दुधाच्या वाहनांची अडवणूक करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. यावेळी जगदीश डवले, विश्वभर हाके, गणेश हाके. विलास शेळके आदींची उपस्थिती होती.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या