पंकज पाटील चित्रा न्युज
नवी दिल्ली :- नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर सर्वांच्या नजरा मंत्र्यांना देण्यात आलेल्या खात्यांकडे लागल्या होत्या. अखेर आज सोमवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी 3.0 सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. .
मोदी मंत्रिमंडळातील विशेष बाब म्हणजे काही जुन्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल करण्यात आलेला नाही. अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, धर्मेंद्र प्रधान आणि निर्मला सीतारामन यांसारख्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये कोणताही फेरबदल झालेला नाही. तर शिवराज सिंह चौहान यांना कृषी मंत्री करण्यात आले आहे. रक्षा खडसे या मंत्रिमंडळात सामील झालेल्या सर्वात तरुण महिला मंत्री आहेत. त्यांना युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयात राज्यमंत्री करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील मंत्र्यांना कोणती खाती?
नितीन गडकरी - रस्ते आणि परिवहन वाहतूक मंत्रालय
पियुष गोयल - वाणिज्य मंत्रालय
रक्षा खडसे - क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री
मुरलीधर मोहोळ - सहकार आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री
रामदास आठवले सामाजिक न्याय राज्यमंत्री
प्रतापराव जाधव आयुष आणि आरोग्य राज्यमंत्री
महाराष्ट्रातून नितीन गडकरी आणि पियुष गोयल यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले होते. दोघांनीही आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. नितीन गडकरी यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची हॅटट्रिक केली आहे. गडकरी यावेळी नागपूर लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. तर पियुष गोयल उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. महाराष्ट्रात सर्वात जास्त मताधिक्य पियुष गोयल यांना मिळाले होते. दरम्यान, आता त्यांनी पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रिपद खेचून आणले आहे.
मोदींच्या मंत्रिमंडळात कुणाला कोणतं मंत्रालय ?
अमित शाह - गृह मंत्रालय
राजनाथ सिंह - संरक्षण मंत्रालय
एस जयशंकर - परराष्ट्र
नितीन गडकरी- रस्ते आणि वाहतूक
निर्मला सीतारमन - अर्थ मंत्रालय
शिवराज सिंह चौहान - कृषी मंत्रालय
जतीन राम - सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय
पियुष गोयल - वाणिज्य
अन्नपूर्णा देवी - महिला आणि बाल विकास मंत्रालय
भूंदरपे यादव - पर्यावरण
राम मोहन नायडू - नागरी उड्डाण मंत्रालय
जेपी नड्डा - आरोग्य मंत्रालय
सर्वानंद सोनोवाल पोर्टशिप मंत्रालय
सी आर पाटील - जलशक्ती
किरण रिजीजू - संसदीय कार्यमंत्री
धर्मेंद्र प्रधान - शिक्षण मंत्री
राज्यमंत्री
श्रीपाद नाईक- गृहनिर्माण आणि ऊर्जा राज्यमंत्री
शोभा करंदाजे - राज्यमंत्री सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय
शांतनु ठाकुर - पोर्टशिप मंत्रालय, राज्यमंत्री


0 टिप्पण्या