Ticker

6/recent/ticker-posts

प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले कडून आढावा बैठक

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज 
भंडारा:- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष तथा आमदार नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली लाखनी तालुक्यातील बुथनिहाय आढावा बैठकीचे शनिवार(ता.१५जून) रोजी शासकीय विश्रामगृहात आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत लोकसभा निवडणुकीत ग्रामीण भागातील बुथ व शहरी भागातील प्रभागानूसार मिळालेली मताची टक्केवारीची आकडेवारी घेण्यात आली. आगामी विधानसभा निवडणुकीत आपण कमी पडणार नाही याचा अभ्यास करावा व मतदारांना कसे प्रभावीत करता येईल याकरीता काम करावे. प्रत्येकाने प्रभागातील लोकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेऊन समस्यांचे निराकरणाचे काम करायला सूरवात करा. काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे जनतेला पटवून द्यावी. जनतेमध्ये जास्तीत जास्त जनसंपर्क वाढवावा. अशा सूचना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्या. यावेळी यांच्यासह माजी राज्यमंत्री सतिश बाबू चतुर्वेदी, नवनिर्वाचित खासदार डॉ. प्रशांत पडोळे, समाजकल्याण सभापती मदन रामटेके, भंडारा जिल्हा उपाध्यक्ष ऍड. शफी लध्दानी, प्रदेश प्रतिनीधी आकाश कोरे, डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष डॉ. चंद्रकांत निंबार्ते, मजूर संघाचे जिल्हाध्यक्ष भरत खंडाईत, महिला व बालविकास सभापती स्वाती वाघाये, पंचायत समिती सभापती प्रणाली सार्वे, लाखनी तालुका काँग्रेस अध्यक्ष योगराज झलके, महिला काँग्रेस अध्यक्षा पुष्पा डुंभरे, शहर काँग्रेस अध्यक्ष मोहन निर्वाण, शहर महिला काँग्रेस अध्यक्षा कल्याणी भिवगडे, लाखनी तालूका युवक काँग्रेस अध्यक्ष यशवंत खेडीकर, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष नगर सेवक विपुल कांबळे, जिल्हा परिषद सदस्या डॉ. मनिषा निंबार्ते, विद्या कुंभरे, पंचायत समिती सदस्या मनिषा हलमारे, पंचायत समिती सदस्य विकास वासनिक, सुनिल बांते यांचेसह काँग्रेसच्या विविध सेलचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी, काँग्रेस कार्यकर्ते, ग्रामीण व शहरी बुथ व प्रभाग पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या