Ticker

6/recent/ticker-posts

पाहूनगाव येथे उष्माघाताने युवकाचा मृत्यू


पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज

भंडारा :- स्वमालकीचे शेतात उन्हाळी धान परिपक्व झाल्यामुळे कापणीचे काम करीत असतांना भोवळ येऊन खाली पडल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार(ता.१४जून) रोजी घडली. मृतकाचे नाव अमोल मुखरण भुसारी(३०) रा.पाहुनगाव, तालुका लाखांदूर असे  आहे. वैद्यकिय अधिकाऱ्याने उष्माघाताने मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. लाखांदूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू आहे.  
                     सध्या मृग नक्षत्राची सुरुवात झाली असून पावसाअभावी पारा ४३ अंशावर असल्यामुळे कडक उन आहे. उन्हाळी हंगामातील धान परिपक्व झाल्यामुळे कापणीचा हंगाम सुरू आहे. शुक्रवारी सकाळी अमोल भुसारी आपले शेतात धान कापणीकरिता गेला होता. अचानक त्याला भोवळ आल्याने तो खाली पडला. सोबतच्या मजुरांनी आरडाओरड केल्याने आजूबाजूचे शेतातील मजूर मदतीसाठी धावून आले. त्यांचे सहकाऱ्याने अमोल ला ग्रामीण रुग्णालय लाखांदूर येथे उपचारासाठी नेण्यात आले. कर्तव्यावरील वैद्यकिय अधिकाऱ्याने तपासून मृत घोषित केले व मृतदेह उत्तरीय परिक्षणासाठी पाठविला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांचे ताब्यात देण्यात आला. उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकारी यांनी सांगितले. स्थानिक स्मशानभूमीत त्याचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. लाख दूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. मन मिळावू अमोल च्या अकाली निधनाने गावात हळहळ व्यक्त होते आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या