Ticker

6/recent/ticker-posts

खुरगाव नादुसा येथे महिलांच्या श्रामणेर प्रशिक्षण शिबिरास सुरुवात भदंत पयाबोधी थेरो व आर्या उपलवन्ना आर्या प्रजापती यांनी धम्म दिक्षा दिली


श्रीकांत बारहाते चित्रा न्युज 


हिंगोली :-खुरगाव नादुसा येथील ऋषिपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित खुरगाव नादुसा येथे महिला श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात दहादिवसिय श्रामणेर प्रशिक्षण शिबिराला सुरुवात झाली असून अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्म गुरू संघनायक भदंत पयाबोधी थेरो श्रीलंकेच्या भिक्खूनी आर्या उपलवन्ना आर्या प्रजापती यांनी 28 बौद्ध उपासक उपासिका यांना श्रामणेर धम्म दिक्षा दिली यात 10 महिलाचा समावेश आहे हे शिबिर 19 तारखेपर्यंत चालणार असल्याची माहिती भदंत पयाबोधी थेरो यांनी सांगितले  यावेळी भिक्खू संघासह उपप्राचार्य साहेबराव इंगोले इंजिनिअर भरतकुमार कानिदे विपश्यनाचार्य गौतम भावे रत्नमाला भावे माया पाईकराव प्रा.यशवंत पाईकराव डॉ प्रतिक्षा कोल्हे दिनेश कोल्हे सिद्धांत इंगोले अपेक्षा इंगोले प्रज्ञाधर ढवळे आप्पाराव नरवाडे नागोराव नरवाडे आदिची उपस्थिती होती दिनांक 8 जुन रोजी मुलगी आयुष्य.तेजस्विनी अभिजीत लोणे यांच्या जन्म दिनानिमित्त श्रामणेर प्रशिक्षण शिबिरास भंतेजी उपासक व उपासिका यांना भोजनदान दिले याप्रसंगी पुज्य भंतेजी पयाबोधी थेरो सोबत लोणे परीवार व भवरे परीवार तसेच या प्रशिक्षण केंद्रात वर्षाभरात केव्हाही दिक्षा दिली जाते श्रिलंकेच्या भिक्खूनी आर्या उपलवन्ना आणि आर्यांजी प्रजापती यांच्या पुढाकाराने उपासिका जोती रोकडे सावित्री आडकुते सुरेखा इंगोले इंदुबाई ढोले कुसुम धुतराज मयुरी धुतराज सह्याद्री गच्चे अंतरा राउत शिला पडघणे हर्षदा पाईकराव यांना श्रामणेर दिक्षा दिली तसेच प्रताप वाघमारे अशोक शेळके भिमराव इंगोले हर्षद धुतराज असंग गच्चे रतन निवडंगे रमेश सोनवणे अविनाश धुतराज आदर्श गच्चे रामदास भिसे विशाल गायकवाड दर्शन माजरंमकर प्रेमल गव्हाणे भिमसेन वाघमारे महेंद्र मगरे आदर्श कांबळे अभिराज हटकर वैभव थोरात या बालकांनाहि भदंत पयाबोधी थेरो यांनी दिक्षा दिली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या