काशिनाथ नाटकर वसमत
वसमत :-आज दिनांक 11 जून 2024 रोजी श्री चैतन्य शिक्षण संस्था संचलित, महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय वसमत येथे थोर समाजसेवक, स्वातंत्र्य सेनानी, शिक्षक परमपूज्य साने गुरुजी यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. सदरील कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव अॅड. रामचंद्रराव बागल हे होते. प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक विकास मस्के, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री सुरेश अग्रवाल पर्यवेक्षक श्री रामदास दुमाने यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीस साने गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून साने गुरुजी यांना अभिवादन करण्यात आले. प्रसंगी मुख्याध्यापक विकास मस्के रामदास दुमाने उद्धव कदम संजय माचेवार श्रीमती संगीता देशमुख त्यांनी साने गुरुजींच्या जीवनावर विचार व्यक्त केले. अध्यक्षीय समारोपात अॅडव्होकेट रामचंद्रराव बागल यांनी साने गुरुजी यांनी निस्वार्थ सेवा समाजाची केली. तसेच विद्यार्थ्यांवर संस्काराचे मूल्य कसे रुजविले याबद्दल माहिती दिली.
सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गजानन पाठक यांनी केले तर आभार श्री संजय माचेवार यांनी मानले. या शिक्षक शिक्षिका शिक्षिकेतर कर्मचारी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.


0 टिप्पण्या