Ticker

6/recent/ticker-posts

बार्टीकडून राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या स्मृतिदिन अभिवादन कार्यक्रम

काशिनाथ नाटकर वसमत 

वसमत:: सामाजिक न्याय व विशेष साहाय विभागाची स्वायत्त संस्था डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे .प्रकल्पाधिकारी सिद्धार्थ गोंवदे यांच्या मार्गदर्शनाखाली समतादूत  मिलिंद आळणे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्त त्रिवार मानाचा मुजरा .सर्वप्रथम राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्रिवार अभिवादन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मंदाकिनी डुकरे होत्या .प्रमुख पाहुण्या शांताबाई जगताप ,संजना जैस्वाल ह्या होत्या यावेळी छत्रपती शिवरायांच्या मनात स्वराज्याची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या स्वराज्यांनी राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्यात आला.राजमाता जिजाऊ या नावाने प्रसिद्ध असलेल्या राजमाता जिजाऊ या एक प्रशासक योद्धा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता होत्या. राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी महाराष्ट्रातील सिंदखेड जवळ देऊळगाव राजा येथे झाला शिवरायांच्या राज्याभिषेक का नंतर बारा दिवसांनी 17 जून 1664 साली जिजाऊंनी रायगडच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी अखेरचा श्वास घेतला.                  अराजकतेच्या पार्श्वभूमी वरती मूर्तीमंत शिवराज्य उभं करणाऱ्या राजमाता म्हणजेच जिजाऊ माता. विखुरलेल्या देश बांधवांना एकतेच्या  सूत्रात गुंफून स्वराज्याचे जन आंदोलन उभे करणाऱ्या राजमाता जिजाऊ यांचे जीवन चरित्र अत्यंत प्रेरणादायक आहे. जिजाबाई यांच्या सद्ण शौर्य आणि दूरदृष्टीसाठी ओळखल्या जात होत्या. त्या एक कुशल घोडेस्वार देखील होत्या. त्या अत्यंत कुशलतेने तलवार शिकून शकत होत्या. हे सर्व गुण त्यांनी शिवरायांना दिले शिवरायांना जिजाऊंचे संस्कार लाभले म्हणूनच स्वराज्य उभे राहिले. अशा राजमाता जिजाऊ माते ची आज पुण्यतिथी असून त्यांना विनम्र अभिवादन. यावेळी निशा ठाकूर ,माया काटोडे ,पुष्पाबाई मनोहरे ,संजना जैस्वाल ,आराधना आळणे,शांताबाई जगताप मंदाकिनी डुकरे ,प्रणव अळण आधी मोठ्या संख्येने उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या