Ticker

6/recent/ticker-posts

दहा हजारांची लाच घेताना सहकार अधिकारी गजाआड


रुपाली डोंगरे चित्रा न्युज 
छत्रपती संभाजीनगर :-मागासवर्गीय सहकारी संस्था अवसायनातून काढण्याचा बाहेर आदेश काढण्यासाठी ५० हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती १० हजारांची लाच घेताना उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयातील सहकार अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने ३१ मे रोजी ही कारवाई केली.

भारत किसनराव झुंजारे (४८, रा. पायलटवावा नगरी, एन २, सिडको) असे लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे. अधिक माहितीनुसार, तक्रारदार यांची मयुरपार्क येथे मागासवर्गीय सहकारी संस्था आहे. ही संस्था अवसायनात निघाली होती. मात्र, ती संस्था अवसायनातून काढण्याचा बाहेर आदेश काढण्याच्या बदल्यात निराला बाजार येथील उपनिबंधक सहकारी संस्था येथील कार्यालयाचा वर्ग २ चा सहकार अधिकारी भारत झुंजारे याने ५० हजारांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराने याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाकडे केली. ३० मे रोजी एसीबीच्या पथकाने लाच मागणीची पडताळणी केली. तेव्हा झुंजारे याने तडजोडीनंतर ३० हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यावरून एसीबीच्या पथकाने ३१ मे रोजी सापळा रचला. त्यात झुंजारे याने १० हजारांची लाच घेताना त्याला रंगेहाथ पकडले. या प्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अपर अधीक्षक मुकुंद आघाव, उपअधीक्षक संगीता पाटील यांच्या मागर्दर्शनाखाली उपअधीक्षक गोरखनाथ गांगुर्डे, जामदार साईनाथ तोडकर, राजेंद्र सिनकर, सी एन बागुल यांनी केली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या