चित्रा न्युज प्रतिनिधी
शहादा:-अनुसूचित जाती,जमाती व मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून प्रवेश शुल्क आकारणा-या महाविद्यालयावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्या महाविद्यालयाची मान्यता रद्द करा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदूरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.मागणीचे निवेदन तहसीलदार शहादा यांना देण्यात आले आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्याध्यक्ष गोपाल भंडारी,राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे,रमेश पटले सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय,सांस्कृतिक कार्य व विशेष सहाय्य विभाग, शासन शुद्धीपत्रक क्रमांक ईबीसी-२००५/ प्रक्र. ४०१/मावक-२ दिनांक १७ जानेवारी २००६ व मा.आयुक्त, समाज कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे परिपत्रक क्रमांक १८२३/ २७ जून २०१३ परिपत्रकानुसार अनुसूचित जाती, जमाती व मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची फी वसूल करू नये,असे नमूद करण्यात आले आहे.परंतू काही महाविद्यालयात अनुसूचित जाती,जमाती व मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून प्रवेश शुल्क मागून लुटमार केली जात आहे.अशा सर्वच महाविद्यालयातील प्राचार्य, मुख्याध्यापक यांना आपल्या मार्फत सख्त आदेश देण्यात यावेत की, जे महाविद्यालयातील प्राचार्य, मुख्याध्यापक शासकीय नियमाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रकारची विद्यार्थ्यांकडून फी वसूल करीत असतील,त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करून महाविद्यालयाची मान्यता रद्द करण्यात यावी.अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदूरबार यांच्याकडे करण्यात आली आहे.
0 टिप्पण्या