Ticker

6/recent/ticker-posts

"लोहार शिक्षण परिषद विध्यार्थ्यांच्या दारी"या उपक्रमांतर्गत पुण्यातील शिक्षण प्रेमी लोहार समाज बांधवांची वंचित विध्यार्थ्यांना काळेवाडी, पुणे येथे प्रत्यक्ष घरी जाऊन शैक्षणिक मदत व मार्गदर्शन


सोमनाथ खंडागळे सोलापूर 
सोलापूर :-लोहार समाजातील मुलामुलींनी प्रतिकूल परिस्थितीचा बाऊ न करता प्रयत्नपूर्वक अभ्यास करून यश संपादन केले पाहिजे. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षणप्रेमी व संवेदनशील समाज बांधव सतत वंचित होतकरू  व हुशार मुलांच्या पाठीशी मदतीचा   हात देतील  असे प्रतिपादन लोहार समाज शिक्षण परिषद महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष प्राचार्य सुभाष कौसे यांनी शनिवारी ता.८ रोजी काळेवाडी येथे केले.
यावेळी पुणे मेट्रोचे सल्लागार श्री. शिवाजीराव चाफेकारंडे,  लोहार शिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्याचे उपसचिव,तसेच पुणे विभागाचे  मुख्य संयोजक व मराठवाडा मित्रमंडळ महाविद्यालय पुणेचे प्रा.संजयकुमार कांबळे सर,अखिल महाराष्ट्र लोहार समाज संघाचे अध्यक्ष  श्री.संदीपजी थोरात,समाज शिक्षण प्रेमी  श्री.दिलीप लोहार,श्री.सुनिल चव्हाण,सौ.चाफेकारंडे 
ताई, लोहार समाजसेवक  श्री.शिवाजीराव कळसे,श्रीमती वैशालीताई पोपळघट आदी मान्यवर उपस्थित होते.
"लोहार शिक्षण परिषद, आपल्या दारी" या अभियानाअंतर्गत परिषदेच्यावतीने काळेवाडी परिसरातील प्रतिकूल परिस्थितीचा सामना करून इयत्ता १० वी  बोर्ड परिक्षेत घवघवीत यश प्राप्त केलेल्या कु.साक्षी धोंडिबा लोहार,तसेच वडिलांचे छत्र हरपलेले चि.भावेश कव्हळे,  चि.आरोहन व कु.ऋतुजा पोपळघट या चार विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान करून त्यांना शालेय क्रमिक पुस्तके,वह्या व गणवेशासाठी आर्थिक मदत मान्यवरांच्या हस्ते संबंधित मुलामुलींच्या घरी जाऊन करण्यात आली. ऋतुजाचा सन्मान श्रीमती पोपळघट यांनी स्विकारला.
याप्रसंगी उपसचिव श्री.कांबळे म्हणाले की, समाजातील सर्व हुषार व गुणवंत विद्यार्थ्यांसोबतच इतर विद्यार्थ्यांना देखील शिक्षण परिषद लवकरच स्पर्धा परीक्षेची तयारी,नोकरी मार्गदर्शन, व्यवसाय मार्गदर्शन व नवीन शैक्षणिक धोरण व संधी, आणि मुलाखतीला सामोरे जातानाची तयारी या विषयावर नामांकित व अनुभवी तज्ञांची कार्यशाळा आयोजित करणार आहे. 
पालकांनी घरी आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानून समाधान व्यक्त केले.आपल्या अडचणीत  आपल्या मुलांच्या पाठीशी कोणीतरी समाजबांधव  शैक्षणिक मदतीचा हात देतात ही भावना सर्व पालकांना सुखावणारी  तर होतीच, शिवाय कृतज्ञतेचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे झळकत होते. उपस्थितांचे आभार श्री.सुनिल चव्हाण यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या