राकेश आसोले चित्रा न्युज
बीड:- आज समस्त मराठा समाजाने मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरत आक्रमक पवित्रा घेतला आहे. काल पंकजा मुंडे यांच्या समर्थनार्थ शिरूर तालुक्यात बंदची हाक देण्यात आली होती. याच दरम्यान झालेल्या भाषणात माजी जिल्हा परिषद सदस्य दशरथ वनवे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केल्यामुळे मराठा समाज संतप्त झाला आहे.
माने कॉम्प्लेक्स परिसर ते पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत मराठा बांधवांनी मोर्चा काढून जोरदार घोषणाबाजी केली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात सोशल वॉर सुरू आहे, ज्यामुळे दोन समाजांमध्ये तणाव निर्माण होण्याची परिस्थिती आहे. पोलिसांनी या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवले असून, शांततेचं आवाहन केले आहे. मात्र, सोशल वॉर अद्याप थांबलेला नाही.
मराठा समाजाने दशरथ वनवे यांच्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध केला असून, त्यांनी माफी मागावी आणि त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्याकडे केली आहे.
मंगेश पोकळे, मराठा समन्वयक:"दशरथ वनवे यांनी केलेले विधान अत्यंत आक्षेपार्ह असून, आम्ही त्यांच्या या वर्तनाचा तीव्र निषेध करतो. मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत."
हनुमान मुळीक, जरांगे पाटील यांचे विश्वासू:"जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आम्ही सर्व मराठा बांधव रस्त्यावर उतरलो आहोत. वनवे यांनी माफी मागावी आणि प्रशासनाने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी."
आज पंकजा मुंडे यांच्या समर्थनार्थ परळी बंदची हाक दिली असताना दुसरीकडे बीडमध्ये मराठा समाजाने रस्त्यावर उतरत जरांगे पाटील यांचं समर्थन करत आंदोलन केलं आहे. प्रशासनाने परिस्थिती हाताळण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत.


0 टिप्पण्या