• नगर परिषद मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण यांनी दिले आदेश
• सामाजिक कार्यकर्ता डॉ. दीपराज इलमकर यांनी केली होती तक्रार
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- बीटीबी सब्जी मंडीचे संचालक लोकांकडून बळजबरीने वेगवेगळे बाजार कर सांगून अवैध वसुली करून लोकांसह शासन व नगर परिषदेचे महसूल बुडवून आर्थिक फसवणूक करीत असल्याचे सामाजिक कार्यकर्ता डॉ. दीपराज इलमकर यांचे तक्रारीवरून नगर परिषद भंडारा चे मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण यांचे पत्र क्रमांक नपभं/सामान्य प्र.वि./२१७८/२०२४ दिनांक १४ जून २०२४ अन्वये महाराष्ट्र नगर परिषद नगर पंचायती औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ मध्ये मुख्याधिकारी यांना प्रदान केलेल्या अधिकारानुसार बीटीबी सब्जी भाजी व्यापारी असोसिएशन यांना पुढील आदेशापर्यंत बीटीबी परिसरात कोणत्याची प्रकारची अवैध वसुलीस मनाई केली असून अवैध वसुली न थांबविण्यास आपणाविरुद्ध संहितेनुसार पोलिस ठाणे भंडारा येथे गुन्हा दाखल करण्यात येईल. असे आदेश परित केले आहे.
भंडारा येथील आठवडी बाजार बडा बाजार येथे भरत असल्याने वाहनतळाचा प्रश्न निर्माण होत असे. सातत्याने वाहतुकीस अडचणीमुळे नगर परिषदेने मोठा बाजार दुसरीकडे स्थानंतरणाचा निर्णय घेतला. त्यानंतर नगर परिषद भंडारा येथील नझुल सीट क्रमांक ५४ प्लॉट क्रमांक २०/४ येथील १.५० एकर जागा देण्यात आली. परंतु त्या जागेचा विकासासाठी नगर परिषदेकडे निधी नसल्यामुळे २०१५ मध्ये ही जागा बंडू तनाराजी बारापात्रे याला काही अटी व शर्तीचे आधारे लिजवर देण्यात आले. त्यांनी १ संस्था तयार करून त्याचे बीटीबी असे नामकरण केले. तेव्हापासून सदर संस्थेने बीटीबी मध्ये येणाऱ्या शेतकरी वर्ग व भाजीपाला विकत घेणाऱ्या लोकांकडून बाजार मेंटेनन्स च्या नावाखाली साफसफाई, इलेक्ट्रिक, शौचालय व बाथरूम सफाई, पाणी पुरवठा इत्यादी खर्च व येणाऱ्या जाणाऱ्या वाहणाकडून गेटपास देऊन पार्किंग चे नावाखाली मागील अनेक वर्षापासून अवैध वसुली करून दररोज अंदाजे २ लाख रुपये अवैध वसुली करीत असल्याचे सामाजिक कार्यकर्ता डॉ. दीपराज इलमकर यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद आहे.
वास्तविकता तपासल्यानंतर सदर संस्था ही दररोज मेंटेनन्स च्या नावाखाली २ लाख रुपये अवैध वसुली करीत असल्याचे निदर्शनास आले. बीटीबीत व्यापारी स्वतः आपले दुकानाचे इलेक्ट्रिक बील, पाण्याचे बील व साफसफाई करीत असत. तर नगर परिषद साफसफाई करून कचरा बाहेर घेऊन जाते. त्यामुळे बीटीबी चा खर्च होत नाही. मात्र तो अकारण इतर लोकांकडून बळजबरीने वेगवेगळे बाजार कर सांगून अवैध वसुली करीत असे. पण हिशेब देत नसे किंवा झालेला खर्च सार्वजनिक सुद्धा करीत नसे. विविध मार्गाने प्रती दिवस २ लाख रुपये असे महिन्याकाठी ६० लाख रुपये अवैध वसुली करीत असल्याने लोकांसह शासनाची व नगर परिषदेचा महसूल बुडवून आर्थिक फसवणूक करीत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ता डॉ. दीपराज इलमकर यांनी मुख्याधिकारी नगर परिषद भंडारा यांचेकडे दिली होती. या तक्रारीची दखल घेऊन मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण यांनी दिनांक १४ जून २०२४ ला बीटीबी अध्यक्ष बंडू बारापात्रे यास मार्केट मध्ये होत असलेली अवैध वसुली तत्काळ थांबविण्याचे आदेश दिले आहे.
*लिज चे नूतनीकरण करू नये(चौकट)*
बीटीबी सब्जी मंडीची लिज ३० जुलै २०२४ ला संपणार आहे. त्यामुळे सदर संस्था अवैध वसुली करणारी संस्था असून करारनाम्यातील अटी व शर्तीचा सातत्याने भंग करीत असल्यामुळे लिज चे नूतनीकरण करण्यात येऊ नये. असे सामाजिक कार्यकर्ता डॉ. दीपराज इलमकर यांनी मुख्याधिकारी नगर परिषद भंडारा यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे.
*पोलिस प्रशासनाचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र(चौकट)*
जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांनी बंडू बारापात्रे हा बीटीबी मार्केट मध्ये अवैध वसुली करून शासनाची फसवणूक करीत असल्याचे १६ नोव्हेंबर २०२३ ला जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांना पत्र दिले होते.
0 टिप्पण्या