Ticker

6/recent/ticker-posts

जबरदस्त कारवाई | फरार इन्नु डॉनला हर्सूल तलावातून अटक


रुपाली डोंगरे चित्रा न्युज 
छत्रपती संभाजीनगर :-गेल्या अनेक महिन्यापासून फरार असलेला सराईत गुन्हेगार शेख युनुस उर्फ इन्नु शेख जब्बार (३३, वर्षे, हिमायत बाग) यास हर्सूल तलाव परिसरातून अटक करण्यात आली आहे. पोलिसांना हुलकावणी देण्यास तो सातत्याने यशस्वी होत होता. मात्र आज (दि.८) पोलिसांना तो हर्सूल तलाव परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यावेळी डीसीपी बगाटे सर्व पथकासह घटनास्थळी दाखल झाले. 

आरोपी हा तलावामध्ये पाण्याचे कडेला थांबलेला होता. त्यावरुन सर्व बाजुन सापळा रचून टिम मधील पोउपनि प्रशांत मुंडे सोबत पोह जनार्धन निकम व सोहेल पठाण असे खाजगी मोटार सायकल वर त्याचे जवळ गेले. त्यास शंका येताच त्याने तलावातील पाण्यात उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कसलाही विचार न करता पोलिसांनी पाण्यात उडी घेतली. त्यास पकडून पाण्याबाहेर आणले. त्यावेळी नितीन बगाटे यांनी तलावाच्या पाण्यात उडी मारुन आरोपीस पकडणारे पोउपनि प्रशांत मुंडे व पोह जनार्धन निकम यांना प्रोत्साहानपर प्रत्येकी 10,000/रुपये बक्षीस घोषित केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या