Ticker

6/recent/ticker-posts

नौकरीचे आमिष दाखवून पाच लाख रुपयांची जामखेड येथील महिलेची फसवणूक.

अण्णासाहेब सावंत व इतर दोघांवर गुन्हा दाखल न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषण करण्याचा आलका शिंदे यांनी निवेदनाद्वारे दिला इशारा..

सुजित धनवे चित्रा न्युज 

जामखेड :- जामखेड येथील रहिवासी अलका नामदेव शिंदे यांनी पोलीस अधीक्षक साहेब अहमदनगर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माझ्या मुलाला नोकरीच्या आमिष दाखवून पाच लाख रुपये घेतले, परंतु नोकरी न लावता परत पैसे देण्यास अण्णासाहेब उर्फ श्रीकृष्ण सावंत, यासीन हुसेन शेख व विठ्ठल ज्ञानेश्वर सावंत यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अन्यथा मी सहकुटुंब जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक 24 जून 2024 पासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा निवेदनात अलका शिंदे यांनी दिला आहे.

याबाबत सविस्तर माहिती देताना त्या म्हणाल्या की, मी जामखेड येथील रहिवासी असून माझे पती विठ्ठल किसन कदम व मुलगा सौरव विठ्ठल कदम असे एकत्र राहतो माझा मुलगा याचे G N M शिक्षण झाले असून तो पदवीधर आहे, तो सध्या जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात तात्पुरत्या स्वरूपात ऑपरेटर इंट्री डाटा या पदावर तात्पुरत्या स्वरुपात खाजगी काम करीत आहे, त्या ठिकाणी माझ्या मुलाची ओळख यासीन शेख यांच्याबरोबर झाली त्यानंतर त्याने श्रीकृष्ण व उर्फ अण्णासाहेब सावंत यांच्यासोबत माझ्या मुलाची ओळख करून दिली. ते दोघे माझ्या मुलाला म्हणाले की,तू सध्या सरकारी दवाखान्यात खाजगी  नोकरी करतो तुला आम्ही कायमस्वरूपी नोकरीचे काम करून देतो तू तुझ्या आई-वडिलांना 15 लाख रुपये देण्यास सांग असे म्हणाले व सुरुवातीला आम्हाला पाच लाख रुपये द्या व नंतर नोकरीचे काम झाल्यावर दहा लाख रुपये द्यावे लागतील असे अण्णा सावंत म्हणाला, तसेच माझे मंत्रालयामध्ये खूप ओळखी व मंत्र्यांबरोबर चांगले संबंध आहेत व मंत्र्यांचे पीए माझे मित्र आहेत असे सांगितले व तुझ्या नोकरीचे काम एक महिन्यात करतो असे सांगितले. त्यानंतर माझा मुलगा मला माझ्या नोकरीच्या कामासाठी मला पाच लाख रुपये मला मागू लागला व माझ्याकडे हट्ट धरू लागला त्यानंतर मी पाच लाख रुपये देण्यास तयार झाले. त्यानंतर अण्णा सावंत यांनी यासीन शेख मार्फत माझ्या मुलाच्या व्हाट्सअप नंबर वर विठ्ठल ज्ञानेश्वर सावंत यांचा स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचा खाते नंबर 33 38 85 30 533 पाठवला नंतर मी माझ्या स्टेट बँक ऑफ इंडिया च्या 33 89 10 67 884 या खाते नंबर वरून 28/ 12 /2023 रोजी विठ्ठल सावंतच्या बँक खात्यावर पाच लाख रुपये R T G S केले नंतर दोन महिने नोकरीच्या कामाची वाट पाहिली तरी माझ्या मुलाच्या नोकरीचे काम झाले नाही. त्यामुळे माझे पती व मुलगा यांना श्रीकृष्ण उर्फ अण्णासाहेब सावंत यांच्या घरी मी त्यांना पाठवले असता ते म्हणाले की तुम्ही आमच्या नोकरीचे काम केले नाही तरी आमचे पैसे आम्हाला परत द्या असे म्हणाले असता, त्यावेळी अण्णा सावंत या दोघांच्या अंगावर धावून गेला व त्यांना शिवीगाळ केली व परत माझ्या दारात परत पैसे मागायला आल्यास तुम्हा दोघांना जिवंत ठेवणार नाही व तुमचे पाच लाख रुपये परत देणार नाही व काय करायचे ते करून घ्या तुमचे पाच लाख रुपये मी, विठ्ठल व यासीन यांनी वाटून घेतले आहेत माझ्या जामखेड मध्ये मोठे ओळखी आहेत माझा सासरा व मेव्हणा जामखेड न्यायालयात वकील आहेत माझे कोणी वाकडे करू शकत नाही असे तो म्हणाला. मुलगा व पती तिथून निघून घरी आले व पाच लाख रुपयांची फसवणूक झाल्याची आमच्या कुटुंबाच्या लक्षात आले. नंतर आम्ही कायदेशीर कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला.

नंतर मी 14 एप्रिल 2024 रोजी जामखेड पोलीस स्टेशन मध्ये तक्रार अर्ज दिला परंतु पोलीस निरीक्षक महेश पाटील उद्या या परवा या असे कारण  सांगून गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ करीत आहेत, नंतर 15 एप्रिल 2024 रोजी कर्जतचे उपविभागीय अधिकारी मा. वाखारे साहेब यांना सहकुटुंब भेटून स्मरणपत्र दिले, नंतर जामखेड तहसीलदार साहेब, कर्जत प्रांत अधिकारी साहेब, त्यानंतर 27 मे 2024 रोजी जिल्हाधिकारी साहेब व पोलीस अधीक्षक साहेब यांना समक्ष भेटून तक्रारी अर्ज केला आहे. 

याबाबत वरील तिघांवर 23 जून पर्यंत फसवणुकीचा दाखल न झाल्यास दिनांक 24 जून 2024 पासून आम्ही सर्व सहकुटुंब जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे आमरण उपोषणास बसणार असल्याचे अलका शिंदे यांनी निवेदनात म्हटले आहे.
याबाबत माहितीस्तव प्रति त्यांनी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडवणीस साहेब, पोलीस महासंचालक साहेब मुंबई, पोलीस महानिरीक्षक साहेब नाशिक यांना पाठवल्या आहेत.

याबाबत पोलीस निरीक्षक महेश पाटील हे फसवणुकीचा गुन्हा दाखल करतील का? असा प्रश्न पडला आहे. तर या कुटुंबाला न्याय मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याची वेळ येणार का? असा प्रश्न जामखेड मध्ये चर्चेला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या