Ticker

6/recent/ticker-posts

महावितरण वीज कंपनीची विज बिल सक्तीने वसूली, आणि दिवस रात्र विज गुल,,असा उद्धट कारभार,,

विजय चौडेकर चित्रा न्यूज,

नांदेड -: धनेगाव, विणकर वसाहत, मुजामपेठ, वसरणी, या भागातील विज दिवसा, रात्री, कोणत्याही वेळेस सुचना न देता विज गूल करण्याच्या प्रकार चालू आहे, लाईट बिल येतांच तिन ते चार महावितरण कर्मचारी वस्ती, गल्ली, गावांत फिरत असतात आणि गरिबांना विज बिल भरण्याची सक्ती करत असतात नाही भरल तर लाईन कट करण्यात येईल असा दम भरला जातो धनदांडग्या लोकांना विचारतं ही नाहीत, गरिब, दिव्यांग वृद्ध, निराधार,अशा लोकांना फार त्रास देतात गरिबांन कडे त्वरित पैसे भरायला नसतात ते गयावया करतात परिस्थिती आमची फारचं खराब आहे, काही तरी थोडा वेळ द्या तरी हे मुजोर माहावितरण कर्मचारी एक ऐकत नाहीत, शिव्या देणं दमदाटी करण सूरु च असतं आणि आज आठ दिवसांपासून दिवस, रात्री, विज गूल करत आहेत, दिवस असेल तर कसा बसा निघून जातो पण रात्री च्या वेळेला रात्र रात्र जर विज जात असेल तर,या गर्मी च्या दिवसात काय हाल होत असतील त्या नागरिकांचे आणि त्यात अपंग, व्रृद्ध, व्यक्तींना किती त्रास सोसावा लागत असेल रात्र रात्र जागून काढण्याची वेळ आली आहे, सामाजिक कार्यकर्ता विजय चौडेकर यांनी वेळोवेळी फोनवर बोलण्याचा प्रयत्न केला ऐक तर फोन ऊचलत नाहीत आणि दुसरी बाब जर चुकून उचलला काम चालू आहेत वरुनच लाईन बंद आहे,असे उत्तर देऊन फोन कट केला जातो, रोज दिवसा रात्री, कोणते काम चालू असतात त्याच स्पष्टीकरण दिले पाहिजे,हे महावितरण कर्मचारी गरिबांना जाणुन बुजुन त्रास का देत आहेत महावितरण अधिकारी, इंजिनिअर साहेबांनी हे मुजोर माहावितरण कर्मचाऱ्यांना योग्य ती कारवाई करून गरिब नागरिकांचा त्रास कमी करावा वेळोवेळी सांगूनही पेपरला बातमी छापून ही यांचे डोळे उघडत नाहीत,जर ईथुन पूढे गरिबांना विनाकारण त्रास देताल प्रहार स्टाईल ने आंदोलन छेडण्यात येईल,याची दक्षता घ्यावी,,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या