Ticker

6/recent/ticker-posts

अखेर संपुर्ण बेलोरा ग्रामवासी मिळुन तात्काळ बैठक घेऊन, अरबिंदो कंपनी व महसूल अधिकारी यांच्या विरुद्ध फौजदारी कारवाई साठी माननीय पोलिस अधीक्षक चंद्रपूर यांना CRPC कलम १५४ (३) नुसार रिपोर्ट देन्यासाठी साक्षरी मोहीम सुरू केली.


राजेश येसेकर भद्रावती

भद्रावती : संपूर्ण बेलोरा ग्रामवासी मिळुन तात्काळ बैठक घेऊन अरबिंदो कंपनी व महसूल अधिकारी यांच्या विरुद्ध फौजदारी कारवाई साठी माननीय पोलिस अधीक्षक चंद्रपूर यांना CRPC कलम १५४ (३) नुसार रिपोर्ट देण्यासाठी साक्षरी मोहीम सुरू केली. 
जर संघर्षी विनोद खोब्रागडे  जबाबदार व जागृत नागरिक तथा कायद्याचे विद्यार्थी तथा संविधानाचे अभ्यासक तथा सामाजिक कार्यकर्ते तथा लोकसेवक तलाठी,हे रस्त्यावर उतरले तर २४ तासाचा आत  दोन्ही चोर,लुटेरे कंपन्या ,मे.अरबिंदो कंपनी व KPCL कंपनीचे काम बंद करून, हैद्राबाद व बेंगलोर ला पळून जावे लागेल असा थेट इशाराच , विनोद खोब्रागडे यांनी,माननीय SDM वरोरा यांच्या न्यायालयात अपील प्रकरणात,दिला होता व नंतर पत्रकार परिषदेत दिला आहे. 

यापूर्वी  सुद्धा मे.कर्नाटक  EMTA , एम्टा कंपनीचा बॅन्ड, विनोद खोब्रागडे यांनीच FIR दाखल करुन,बजावला होता व एम्टा कंपनी बेंगलोर ला पळून गेली,आताही ती कंपनी बरांज,भद्रावती, नागपूर, बेंगलोर, येथील पत्ता बदलवून वावरत आहे. 
गरीब लोक, शेतकरी भितात, कायद्याचे ज्ञान नसते, म्हणून भ्रष्टाचारी अधिकारी व कर्मचारी आणि चोर, लुटेरे कंपन्या, खुलेआम जबरदस्तीने राष्ट्रीय संपत्तीची लुटमार करुन, अवैध कोळशाचे उत्खनन करीत आहे.

राजकीय पुढारी मंडळी यांचा पासून शेतकऱ्यांनी सावधान राहावे. सुरवातीला कंपनी व पुढारी शेतकऱ्यांचा जमीनीचा भाव ठरवतात,अर्धी रक्कम एकरी प्रथम आपण ठेवतात,व अर्धी रक्कम शेतकरी यांना देतात,
परंत पुढारी यांचा जमीनीचा रेठ तर करोडो मध्ये घेतात,खाली पडीत जमीन राहुनही, अकृषिक करुन ठेवतात,ताकी चौ.मी.प्रमाने करोडो रुपये कंपन्या कडून घेत आहेत. 
आणि शेतकरी परेशान आहे हे कुठेतरी थांबायला पाहिजे,व गावात , शेतकरी वर्गात, जनजागृती झाली पाहिजे
मी फक्त मार्ग दाता आहे,मोक्ष दाता नाही, असे तथागत सिध्दार्थ गौतम बुद्ध म्हणतात असे अपीलार्थी विनोद खोब्रागडे जबाबदार व जागृत नागरिक तथा कायद्याचे विद्यार्थी तथा संविधानाचे अभ्यासक तथा सामाजिक कार्यकर्ते तथा लोकसेवक तलाठी वरोरा चंद्रपूर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या