Ticker

6/recent/ticker-posts

नेरला गावाचे तात्काळ पुनर्वसन करा अन्यथा 5 जुलैला रास्ता रोको आंदोलन


विविध विभागाचे अधिकारी ,जनप्रतिनिधी यांना निवेदन सादर 

संजीव भांबोरे भंडारा 
भंडारा:- भंडारा ते पवनी मुख्य मार्गावर असलेल्या नेरला गावाचे तात्काळ पुनर्वसन करण्यात यावे या प्रमुख मागणी करिता ५ जुलै 2024 ला भव्य रास्ता रोको आंदोलनाचे आयोजन नेरला येथील बस स्थानकावर करण्यात आलेले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, मौजा नेरला गावच्या पुनर्वसन संबंधाने दिनांक 13 /12/ 2023 ला समस्त नेरला गाववाशी यांनी जलसमाधी आंदोलन केले होते .तरीसुद्धा जिल्हा प्रशासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही. तसेच आजपर्यंत नेरला गावाच्या पुनर्वसन संबंधाने कोणती कार्यवाही न झाल्यामुळे नेरला ग्रामपंचायत तर्फे तसेच समस्त ग्रामवासीयांतर्फे भंडारा ते पवनी मुख्य रस्त्यावर असलेल्या नेरला  बसस्थानकासमोर ५ जुलै 2024 रोज शुक्रवारला सकाळी १०ते ५ वाजेपर्यंत रास्ता रोको आंदोलन करण्याचे ठरविण्यात आलेले आहे. निवेदनाच्या प्रती भंडारा-गोंदिया लोकसभेचे खासदार प्रशांतजी पडोळे, भंडारा विधानसभेचे आमदार नरेंद्रजी भोंडेकर, जिल्हा पुनर्वसन अधिकारी भंडारा, जिल्हा पोलीस अधीक्षक भंडारा, उपविभागीय अधिकारी भंडारा, तहसीलदार पवनी, ठाणेदार पोलीस स्टेशन अड्याळ , यांना देण्यात आलेले आहेत . वरील रास्ता रोको आंदोलनात प्रकल्पग्रस्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित होण्याचे आवाहन निर्णय येथील सरपंच छाया तुकडू बारेकर व ग्रामस्थांनी केलेले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या