Ticker

6/recent/ticker-posts

उदगीर ग्रामीण मध्ये 50,000 + बहीणींची नोंद झाली पाहीजे


हंडरगुळीतील कॅंम्प मध्ये तहसीलदार राम बोरगावकर यांचे आवाहन ..

विठ्ठल पाटील लातूर 
लातूर :-मुख्यमंञी माझी लाडकी बहीण या योजनेत एकही पाञ बहीण वंचित राहणार नाही,याची दक्षता घेऊन उदगीर ग्रामीण मध्ये ५०,००० + बहीणींची नोंद करा.असे आवाहन हंडरगुळी येथे आयोजीत कॅंम्प मध्ये उपस्थित अंगणवाडीताई,सुपरवाझर यांना तहसिलदार राम बोरगावर यांनी केले आहे.
या कॅंम्प मध्ये उपस्थित तहसीलदार व बीडीओ.प्रवीण सुरडकर,नायब तहसीलदार बेंबळगे,सरपंच विजय अंबेकर,उपसरपंच बालाजी पाटील, ग्राविअ.एस.आर.कांबळे,तलाठी शिंदे व *जेष्ठ पञकार पप्पू पाटील* यांचा अंगणवाडीताईंनी यथोचित सत्कार केला.तसेच यावेळी हाळीचे तलाठी कुलदीप गायकवाड, हाळीचे ग्राविअ.मनोहर जानतीने,मोजणी अधिकारी जाधव, मबाविप्रअ,आशा सुर्यवंंशी,सदस्य अंकुश अनलदास, बाबू शेख,उमा उडतेवार,चंद्रशेखर महाराज,सतीष सुळे महाराज,नंदू भालेराव,धनाजी मोंगीया,तातेराव खोडेवाड,आलीम शेख,साजीद शेख,यांच्यासह हाळी, हंडरगुळी, सुकणी,एकुरका,अनुपवाडी,आदी गावातील शेकडो अंगणवाडी ताई उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना तहसीदार म्हणाले की,यापुर्वी शासनाचा लाभ घेत असलेल्या (विधवा,अपंग,जेष्ठ} बहीणींना याचा लाभ मिळणार नाही. यासाठी एक रुपया सुध्दा लाभार्थी बहीणींकडून कुणी ही घेऊ नये.आणी जर कुणी CSC सेंटरवाला असेल किंवा अंगणवाडीताई असेल किंवा तलाठी असेल.हे पैसे घेत असल्याचे सिध्द होताच त्यांच्यावर योग्य ती कारवाई करणार,असे *पञकार पप्पू पाटील* यांनी उपस्थित केलेल्या प्रश्ना वर तहसीलदार राम बोरगावर यांनी सांगितले.
यावेळी बीडीओ.प्रवीण सुरुडकर यांनी ही सविस्तर असे मार्गदर्शन केले तसेच अंगवाडीताईंना लागेल ती हेल्प ग्रा.पं.तर्फे करणार,तेंव्हा या योजनेत एकही गरजू बहीण वंचित राहणार नाही.याची काळजी घ्यावी.असे मत उपसरपंच बालाजी पाटील यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे सुञसंचलन व आभार मबाविप्र अधिकारी आशा सुर्यवंशी यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या