रवी भोंगाने साकोली
साकोली:- साकोली पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वांगी येथील सहाय्यक शिक्षक अविनाश शहारे यांचा शाळेच्या वतीने सपत्नीक सेवानिवृत्ती सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच मनोज कुमार शहारे तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच मुकेश कापगते, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राष्ट्रपाल चौधरी, षश्मुखानंद पुस्तोडे, सत्कारमूर्ती सुरेखा शहारे, पोलीस पाटील लोकचंद शहारे, शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष वसंत कापगते, सहाय्यक शिक्षक अनिल भंडारकर, युवराज हूकरे आदी मान्यवरांसह शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी सुद्धा उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी शहारे यांचे शालेय योगदांचे महत्त्व विशद केले. या कार्यक्रमाला गावातील मान्यवर नागरिक, अंगणवाडी सेविका, अशा सेविका, ग्रामपंचायत सदस्य यांनी हजेरी लावली होती. गावकरी,शिक्षक वृंद आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने अविनाश शहारे यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला.


0 टिप्पण्या