Ticker

6/recent/ticker-posts

महामानव डॉ बाबसाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा उद्या 79 वा स्थापनादिन सोहळा --- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले


राज्यपाल  रमेश बैस आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार 

संघदीप मेश्राम चित्रा न्युज 
मुंबई - महामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी गोरगरीब दलित बहुजन समाजातील विद्यार्थ्यांसाठी दि .8 जुलै १९४५ रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली होती.या संस्थेचा दि.८ जुलै २०२४ रोजी सकाळी ११ वाजता  ७९ वा वर्धापन दिन सोहळा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मंत्रालयासमोर  नरिमन पॉईंट येथे साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे सन्माननीय राज्यपाल महामहीम मा.श्री.रमेश बैस उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री  ना रामदास आठवले असून या वेळी प्रमुख पाहूणे म्हणून राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री 
चंद्रकांतदादा पाटील; पी ई  सोसायटी चे उपाध्यक्ष डॉ सुखदेव थोरात; बी के बर्वे; डॉ एस अर भागवत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमादरम्यान शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे यात सत्कारमूर्तींना पी ई सोसायटीतर्फे भारतरत्न डॉ.बाबासाहेब  आंबेडकर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या पुरस्काराचे सत्कारमूर्ती सिम्बॉयसिस सोसायटीचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल संचालिका संजीवनी मुजुमदार, प्रख्यात कायदे पंडित, पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त ॲड.उज्वल निकम, ऍड.बी के बर्वे; माजी सनदी अधिकारी, पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त पानिपत कार डॉ. विश्वास पाटील, सामाजिक चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे,  अभिनेते भालचंद्र (भाऊ) कदम, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. सोहनलाल जैन,  प्रख्यात बौद्ध धम्मगुरु भदंत डॉ. राहुल बोधी तसेच अनेक मान्यवरांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे या पुरस्काराचे आयोजन पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. वामन आचार्य, सहसचिव तथा प्राचार्य सिद्धार्थ महाविद्यालय डॉ.यु.एम.मस्के, कार्यकारी समिती सदस्य चंद्रशेखर कांबळे यांनी केले आहे. 

हा कार्यक्रम दिनांक ८ जुलै २०२४ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मंत्रालयासमोर नरिमन पॉईंट येथे सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आलेला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या