Ticker

6/recent/ticker-posts

लहान खेड्यातला मुलगा ते AI विषयात डॉक्टर: डॉ. चंद्रशेखर कुंभार यांचा प्रेरणादायी प्रवास


रुपाली डोंगरे चित्रा न्युज 
सोलापूर :-सोलापूर मधील बेलाटी गावचे सुपुत्र चंद्रशेखर भागवत कुंभार यांना Artificial Intelligence (AI) या सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमधील प्रबंधास आज कोटा (राजस्थान) येथील विद्यापीठाकडून मान्यता मिळाली आहे. एका लहानश्या खेड्यातून जन्म ते थेट आंतरराष्ट्रीय दर्जाचा अभियंता अशी आपली ओळख बनवलेले चंद्रशेखर कुंभार आता पीएचडी प्राप्त झाल्यानंतर डॉक्टर आणि शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातील.

डॉ. चंद्रशेखर कुंभार यांनी इयत्ता पहिली ते दहावीचे शिक्षण संभाजीराव शिंदे प्रशाला येथे पूर्ण केले. त्यानंतर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमधील डिप्लोमा बीएमआयटी कॉलेज, बेलाटी येथून पूर्ण केला. पुण्यातून त्यांनी पदवी (BE) मिळवली आणि संगणक अभियांत्रिकीतील पदव्युत्तर पदवी (M.Tech) चेन्नई येथे पूर्ण केली. आता राजस्थानमधील कोटा येथून त्यांनी Artificial Intelligence मधून पीएचडी प्राप्त केली आहे.

20 पेक्षा अधिक देशांमध्ये कार्य

या कालावधीत डॉ. कुंभार यांनी सिंगापूर, मलेशिया अशा कॉम्पुटर सायन्स मधील प्रगत असलेल्या जवळपास 20 देशांमध्ये हजारो विद्यार्थी व शेकडो सॉफ्टवेअर कंपन्यांसोबत काम केले आहे. AI या अत्याधुनिक विषयात संशोधन करत असल्याने, देशाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयक प्रगतीत चंद्रशेखर मोलाचा वाटा उचलतील अशी अपेक्षा सर्वांकडून व्यक्त होत आहे.

डॉ. चंद्रशेखर कुंभार यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. त्यांनी आपल्या कठोर परिश्रम आणि अथक प्रयत्नांनी एक साधे खेडेगावातून आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्यांचे कार्य आणि संशोधन देशाच्या विज्ञान क्षेत्रात नवा अध्याय लिहील, अशी आशा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या