वसमत उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीयअधीक्षक) गाढ झोपेत
मोईन कादरी हिंगोली
हिंगोली :-वसमत शहरातील उपजिल्हा रुग्णालयात शहरातील व तालुक्यातील दररोज दोनसे ते तिनसे रुग्ण उपचार घेत असतील रूग्णालयात औषधांच्या बाटल्याचा ढिग किंवा काही रिकाम्या बॉटल दिसणे सहाजीक आहे परंतू येथे दारू च्या रिकाम्या झालेल्या बाटल्या आढळून आल्या आहेत.
रूग्णालयात रात्रीच्या वेळी सामुहीक दारू ढोसण्या अवैध प्रकार बऱ्याच दिवसापासुन सुरू असावा परंतू रात्री नशापाणी जास्त झाल्याने रिकाम्या बाटल्या जाग्यावरच राहील्यामूळे त्या कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत . या वरूण रूग्णालय प्रशासनाचा कारभाराचे स्वरूप लक्षात येते.
दवाखाण्यात रूग्णाच्या नातेवाईकांचा हा कारणामा आहे की रात्री कर्तव्यावर असलेल्या कंत्राटी व कायम कर्मचारी ,रूग्णवाहीका चालकांचा आहे? हा प्रश्ननिर्मान होत असुन रूग्णालय प्रशासनाच्या वैदयकीय अधिक्षकांचा धाक कर्मचाऱ्यावर नसल्या मूळे असे प्रकार होत आसावेत वैदयकीय अधिक्षकांनी त्यांच्या वैयक्तीक व्यवसाया प्रमाणे अधिक्षक पदाला न्याय देणे आवश्यक आहे. जर रूग्णालयाचे कर्मचारी व रूग्णवाहीनीचे चालक रात्री दारू पिऊन मौज मजा करत असतील दरम्यान च्या वेळेत गंभीर अपघात ग्रस्त रूग्ण आला तर त्या रूग्णाला अत्यावशक वैदयकीय सेवा मिळून त्याचा जीवन दान मिळेल का? रूग्णालयात रात्रीच्या वेळी नशापाणी पार्ट्या होत असतील तर रात्री ड्युटीवर असणाऱ्या महिला नर्स,सिस्टर यांना ही या नशेडया कडुन त्रास होत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊण सदरील प्रकार भविष्यात होणार नाहीत या बाबत चौकशी करूण तात्काळ कार्यवाही करावी सर्वांना सुचना देऊण रात्रीच्या वेळी अनुचित प्रकार होणार नाही रूग्णा ना व अपघात ग्रस्ताना चांगली वैदयकीय सुविधा मिळावी या करिता शिस्त लावावी दोषी कर्मचाऱ्यावर रूग्ण हिता साठी कडक कार्यवाही करावी. सुरक्षा रक्षकास ही अयोग्य ,बेशिस्त वर्तना बाबत नोंद घेऊण तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करण्याची सुचना दयावी परिसरात सिसी टिव्ही कॅमेरे ची व्यवस्था करा. व नवीन वैद्यकीय अधीक्षक नियुक्त करावे अशी मागणी जनतेतुन होत आहे.


0 टिप्पण्या