Ticker

6/recent/ticker-posts

💐 || सुमंगल सुप्रभात || 💐‌ 🌞 दिन विशेष 🌞

💐  || सुमंगल सुप्रभात ||  💐
‌          🌞 दिन विशेष  🌞

‌इसवी सन २०२४ -  ८ जुलै 
‌शालिवाहन शक १९४६, विक्रम संवत 
२०८०
‌भा. रा. १७ आषाढ १९४६
युगाब्द ५१२६       
संवत्सर नाम : क्रोधी
अयन : दक्षिणायण 
ऋतू : ग्रीष्म 
मास: आषाढ 
पक्ष: शुक्ल 
तिथी: तृतीया (अहोरात्र) 
वार : सोमवार 
नक्षत्र : आश्लेषा (अहोरात्र) 
राशी : कर्क 

मुस्लिम नूतन हिजरी वर्ष १४४६ व मुहर्रम मास प्रारंभ. 

*डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी* (रायगड) पुण्यस्मरण 

१९४८: अमेरिकेच्या वायुसेना दलात महिलांची भरती सुरू झाली.
१९५४: जगातील सर्वात मोठ्या कालव्यावर भाकरा-नांगल जलविद्युत प्रकल्प सुरु झाला.
१८५६: चार्ल्स बर्न यांना मशीनगन चे अमेरिकेतील पेटंट मिळाले.
१८८९: द वॉल स्ट्रीट जर्नलचा पहिला अंक प्रकाशित झाला.
१९१०: *स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मोरिया या जहाजातून फ्रान्समधील मार्सेल्सच्या समुद्रात ऐतिहासिक उडी घेतली.*
१९३०: किंग जॉर्ज ५ वे यांच्या हस्ते लंडनमध्ये इंडिया हाऊसचे उद्‍घाटन झाले.
१९५८: बर्लिन येथील जागतिक चित्रपट महोत्सवात दो आँखे बारह हाथ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान मिळाला.
१९९७: बीजिंग येथील आशियाई महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेत ४६ किलो गटात भारताच्या एन. कुंजुरानी देवीने रौप्यपदक पटकावले.
२००५: जलवायू परिवर्तन मुद्यावर जी-८ देशांनी आपली सहमती दर्शवली.
२०११: रुपयाचे नवीन चिन्ह असलेली नाणी चलनात आली.

जन्मदिवस
१८३१: कोकाकोला चे निर्माते जॉन पंबरटन
१८३९ : जॉन डी. रॉकफेलर, स्टँडर्ड ऑईल उद्योगसमूह व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील पहिल्या तेल उद्योगाचा संस्थापक, उद्योगपती.
१८८५: ह्यूगो बॉस चे स्थापक ह्यूगो बॉस.
१९१४ : ज्योती बसू, बंगालचे पूर्व मुख्यमंत्री.
१९१६ : गोपाल नीलकंठ तथा गो. नी. दांडेकर, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते मराठी कादंबरीकार, चरित्रकार, इतिहासकार.  ’गडसम्राट’, ’पवनाकाठचा धोंडी’, ’जैत रे जैत’ या त्यांच्या कादंबर्‍यांवर मराठी चित्रपट निघाले.
१९४९: वाय. एस. राजशेखर रेड्डी – आंध्रप्रदेशचे १४ वे मुख्यमंत्री
१९५८ : नीतू सिंग, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
१९७२ : सौरव गांगुली, भारतीय क्रिकेट खेळाडू.

मृत्यूदिन 
१९८४: पद्मश्री पुरस्कृत गोमंतकीय कवी बाळकृष्ण भगवंत तथा बाकीबाब बोरकर
१९९४: गोवा पुराभिलेखचे संचालक डॉ. विठ्ठल त्र्यंबक गुणे 
२००१: प्रसिद्ध तबला वादक उस्ताद बाबासाहेब मिरजकर 
२००३: संत साहित्याचे अभ्यासक ह. श्री. शेणोलीकर 
२००७: भारताचे ९वे पंतप्रधान चंद्रशेखर 
२००८: महाराष्ट्र भूषण पुरस्कार लाभलेले आधुनिक महामानव डॉ. नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी 

       *।। दास-वाणी ।।*

भक्तें जे मनीं धरावें । 
तें देवें आपणचि करावें । 
तेथें वेगळें भावावें । 
नलगे कदा  ।। 

दोनी सामर्थ्ये येक होतां । 
काळास नाटोपे सर्वथा । 
तेथें इतरांची कोण कथा । 
कीटकन्यायें  ।।

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : १०/०७/२३-२४ 

विरक्त भावनेने भक्त अखंड उपासना करतोय. त्याच्या मनात जर एखादी अपेक्षा निर्माण झाली, तर त्याने मागायच्या आतच देव ती इच्छा पूर्ण करतो. परमेश्वराच्या ठायी नित्य अभियुक्त असलेल्या भक्तांचा योग क्षेम भगवंत स्वत:च चालवतो. भक्ताला काही मागावे लागतच नाही.

भरभरून देणारा भगवंत आणि त्याच्याकडे कोणतीही अपेक्षा न करणारा निष्काम भक्त ही सामर्थ्यवान जोडी एकत्र आली तर कळिकाळालाही आवरणार नाही तर सामान्य हितशत्रू काय साधकाला त्रास देणार. त्यांचे उपद्रवमूल्य किडामुंगी इतकेही राहात नाही. देव ज्याचा तारणहार आहे त्याला कोणाची भीती ?

*सगुणभजननिरूपण समास.*

*संकलक : सुधीर देशपांडे (आबा)*

 🙏 💐💐💐💐💐 🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या