Ticker

6/recent/ticker-posts

⭕ साकोली उपजिल्हा रुग्णालयात विशेष आरोग्य सेवा

◻️वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतीश हुमणे यांचे नागरिकांंना आवाहन 

चित्रा न्यूज नेटवर्क / विशेष प्रतिनिधी • आशिष चेडगे 

⭕ साकोली ०७ ऑगस्ट : सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे दर महिन्याच्या प्रत्येक दुसऱ्या आणि चौथ्या शुक्रवारला विविध आरोग्य विषयक कागदपत्रे आणि सर्व आरोग्य लाभ संदर्भात मोहीम सुरू केली आहे. याचा जास्तीत जास्त जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन साकोली उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतीश हुमणे यांनी केले आहे. 

⭕ आरोग्य सेवा पुढील प्रमाणे असून यात अपंगत्वाचे प्रमाणपत्र वाटप करण्यात येईल. जसे अपघातमुळे आलेले अपंगत्व, डोळ्याचे अपंगत्व प्रमाणपत्र, तसेच पॅरॅलिसिस मुळे आलेले अपंगत्वाचे प्रमाणपत्र विशेष तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून दिल्या जातील. ( मानसिक आणि काना संबंधित अपंग प्रमाणपत्र वगळून इतर प्रमाणपत्र मिळतील. ) त्याचबरोबर अस्थी रोग संबंधी आजारांचे उपचार तपासण्या (एक्स-रे ) आणि औषधोपचार करण्यात येईल. त्याच बरोबर डोळ्याचे संबंधित आजारावर देखील उपचार केले जाते व मोतीबिंदूचे निदान करून आवश्यकतेनुसार शस्त्रक्रियेकरिता भंडारा येथे संदर्भित करणे इ. सेवा उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे मिळणार आहेत. तरी सर्व नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे येऊन आरोग्य सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतीश हुमणे उपजिल्हा रुग्णालय साकोली यांनी केलेले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या