Ticker

6/recent/ticker-posts

मुख्यमंञ्याच्या लाडक्या बहिणींना लुटणा-या "गॅंग"ला तहसील कार्यालय "लाईक" व "टॅग" करीत पाठीशी घालत आहे ! उदगीर शहररात व हाळीत चर्चा..!!


विठ्ठल पाटील लातूर 
लातूर :- लोकसभेत सपाटुन मार खाल्ल्यानंतर ताळ्यावर आलेल्या ३ चाकी सरकारच्या अर्थमंञ्यानी चालू अधिवेशनात जाहीर केलेल्या मुख्यमंञी माझी बहीण लाडकी या नव्या योजनेतील लाभार्थी बहिणींनी हवे ते कागदपञ काढण्यासाठी तहसीलसह CSC सेतु केंद्रापुढे गर्दी केल्याचे द्रष्य उदगीर शहरासह हाळीहंडरगुळी व वाढवणा आदी गावात दिसुन येते.व दिवसभर धंदा बुडवुन थांबुन सुध्दा "सर्व्हर डाऊन" व "पोर्टल बंद" आदी कारणांमुळे एकही कागद हाती न घेता हात हालवीत घरी हताश होऊन "बहीणींना" जावे लागत असल्याचे पाहून कांही "चतुर" व्यक्ती उदास दिसणा-या बहीणींना गाठुन आणि त्यांना "ताई,माई व अक्का"! असे म्हणतात.व हवी ती कागदपञ काढुण देण्यासाठी आमिष दाखवतात व कांही रक्कमेची मागणी करतात.आणी शे , पाचशे,हजार घेतले तर काय होतया जन्मभर १५०० रु.मिळणारेत.म्हणुन बहूतांश स्ञी-पुरुष अशा लोकांना कॅश देतात.आणि हा सगळा लुटमारीचा प्रकार कानावर पडूनही उदगीरचे तहसील कार्यालय अशा "गॅंग" ला "फाॅलो" करुन पकडण्याऐवजी या "गॅंग" ला "लाईक" व "टॅग" करित आहेत ! अशी चर्चा तहसील आणि हाळी,वाढवणा परिसरात जाणकार जनतेतुन होताना ऐकू येत आहे..
या नव्या योजनेत मोठी मुदत वाढ करुनही हवे ते कागदं काढण्यासाठी बहूतांश "बहिणी" मजुरी बुडवुन तहसील,सेतू व तलाठी कार्यालयात गर्दी करताना दिसतात.माञ आजपावेतो 1 ही अर्ज दाखल झाला नाही.कारण "सर्व्हर" व "पोर्टल" प्राॅब्लेम.तरीही गर्दी कांही केल्या कमी होत नाही.आणि नेमका याच गर्दीचा व रंधीचा महसुल खाते यांना हाताशी धरुन गरजवंताची लुट करणारी ।गॅंग" शहरासह खेड्यांमध्ये पण "अॅक्टीव" झाली असुन,याची पेपरबाजी होऊन ही ना पिक विमा भरणा-या शेतक-यांना १ नव्हे तर १०० रु.घेऊन लुटणा-या सीएससी सेंटरवाल्यांवर कारवाही झाली.ना मुख्यमंञ्याच्या लाडक्या बहिणींना  ५० ऐवजी हजार ५०० अधिक घेऊन  लुटणा-या "गॅंग" वर . यामुळे ही योजना बहिणींच्या कल्याणासाठी आहे का,आर्थीक लुटमार करणा-या "गॅंग" च्या व सर्व माहिती असुन सुध्दा अशा "गॅंग" ला न पकडता त्यांना "फाॅलो" व "लाईक" करणा-या सं . अधिका-यांच्या फायद्यासाठी ? असे प्रश्न या निमित्ताने चर्चेत आहेत.
दरम्यान पिक विमा भरणा-यांकडून 1 ऐवजी 100 रु.घेऊन लुटणा-या व मुख्यमंञ्याच्या लाडक्या बहिणींची नड लक्षात घेऊन भगीनींना लुटणारे लोकांना "लाईक" करण्याऐवजी अशा "गॅंग" वर तसेच या "गॅंग" ला पाठींबा देणा-या सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी यांचेवर "अटॅक" करायची "डेअरींग" महिला भगीनी असलेल्या जिल्हाधिकारी या दाखविणार का ? याकडे उदगीर तालुक्यातील शेतक-यासह लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे ..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या