Ticker

6/recent/ticker-posts

वाढवणा पो.स्टे.हद्यीत एकाची आत्महत्या

विठ्ठल पाटील लातूर 
लातूर  :-उदगीर तालुक्यातील वाढवणा पोलीस स्टेशनच्या हद्यीमध्ये असलेल्या मौजे.खेर्डा येथील शेतकरी विष्णुकांत रामराव बिरादार वय ३५ याने जनावरांच्या गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना दि.३ जुलै रोजी स.९ ते ९-३० दरम्यान घडली.याप्रकरणी वाढवणा पो.स्टे.मध्ये आकस्मात म्हणुन गुन्हा नोंद झाला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,खेर्डा ता.उदगीर येथील विष्णुकांत रामराव बिरादार हा इसम शेतात गुरे बांधायच्या पञी गोठ्यात लोखंडी अंगलला दोरीने गळफास घेऊन मरण पावला असुन,याविषयी दताञ्य नामदेव बिरादार रा.खेर्डा याने फिर्याद दिलेवरुन वाढवणा पो. ठाण्यात आक्समित मयत.गु.र.नंबर, २३/२०२४ कलम १९४ भा.ना.सं.स. या नविन कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला असुन,पुढील तपास पोलीस करित आहेत..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या