शिक्षण विभागाची बघ्याची भूमिका
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- नुकतेच 10वी चे निकाल लागले असून यावेळी विद्यार्थ्यांना मिळालेली टक्केवारी चकीत करणारी असून विद्यार्थ्यांची विज्ञान विषयात प्रवेश मिळविण्यासाठी धावपळ सूरू आहे. यात पालक वर्ग घरातील जीवनोपयोगी वस्तू विकून तर काही सोने गहाण ठेऊन पैशाची जूळवाजूळव करून आपला पाल्य हा जिल्ह्यातील नामवंत विद्यालयात शिक्षण घेणार. या आशेने कनिष्ठ महाविद्यालयाचे उंबरठे झिजवतांना दिसून येत आहेत. तर काही अत्यंत गरिब पालक शिक्षकांना विनवण्या करून माझ्या मुलाला ईथेच प्रवेश देण्याचा आग्रह धरून असतांना महाविद्यालयिन समितीचा उर्मटपणा गरिब पालकांना वेठीस धरून 10 हजारापर्यंत बोली लावल्याचे विदारक चित्र महाविद्यालयातच्या परिसरात बघायला मिळत आहे. तर ज्या पालकाकडे पैशाची सोय होत नसेल अशा विद्यार्थ्यांना सरळ घरचा मार्ग दाखवून तूमची ऐपत ह्या महाविद्यालयात शिक्षण घेण्याची नसल्याचे सांगून हाकलून लावले जात असून संस्थेने धर्मशाळा उघडली नसून संस्थेला शिक्षकाचे पगार मिळालेल्या पैशातूनच द्यावे लागत असल्याचे बोलले जात आहे.
जिल्ह्यात अनेक विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय अनुदान तत्वावर सुरु आहेत. तरी सुद्धा विज्ञान विभागाकडे विद्यार्थ्यांचा कल बघता शाळा प्रशासन पैशाची बोली बोलून ऍडमिसनच्या नावाखाली विद्यार्थ्यांची आर्थिक लूट करिता असल्याचे बोलल्या जात आहे. यासबंधाने अधिक माहिती घेतली असता गेल्या अनेक वर्षापासून या महाविद्यालयात हा गोरखधंदा सूरु असून यासबंधीत विभागातील वरिष्ठ देखील ह्या धंध्यात गुतले असल्याची चर्चा आहे. या महाविद्यालयात एँडमिशन मिळविण्याचे एकमात्र कारणही समोर आले असून येथे हमखास उत्तीर्ण होण्याची गँरंटी असते. याचे कारणही तसेच आहे. स्वतः च्या महाविद्यालयात परिक्षा केंद्र चालवून एकप्रकारे विद्यार्थी उत्तीर्ण करण्याचा कारखाना सूरू करून याच उद्देशाने विद्यार्थ्यांकडून आर्थिक लूबाडणून करून शिक्षण क्षेत्राला बाजारीकरणाचे स्वरूप आणले जात असले तरी शिक्षण विभाग मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याने शिक्षण विभागाचे कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शासनाने ठरवून दिलेल्या फिस मध्ये गुणानुक्रमे प्रवेश देण्यात यावा. अशी पालकवर्गाकडून मागणी होत असून शिक्षणाचे बाजारीकरण करणाऱ्या संस्था चालकांवर कारवाई होणे गरजेचे झाले आहे.


0 टिप्पण्या