Ticker

6/recent/ticker-posts

बिबट्याचे हल्ल्यात १ शेळी ठार

• गोंडसावरी येथील घटना 

• पशूपालकाचे १३ हजाराचे नुकसान 

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा:-लाखनी येथील वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या गोंडसावरी येथे बिबटाने रात्रीचे सुमारास गोठ्यात शिरून शेळीस ठार करून लगतच्या वन क्षेत्रात नेऊन फस्त केल्याची घटना सोमवार(ता.१जुलै) रोजी घडली. नुकसानग्रस्त पशुपालकाचे नाव मोहन सावजी तुमसरे, रा. गोंडसावरी असे आहे. क्षेत्र सहाय्यक जितेंद्र बघेले, वनरक्षक त्रिवेणी गायधने यांनी पंचनामा केला असून पशूपालकाचे १३ हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे पशुपालकात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या बिबटाचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. 
                       मोहन तुमसरे हे अल्पभूधारक शेतकरी असून शेतीस पूरक म्हणून बकरी पालनाचा व्यवसाय करतात. दिवसा वनक्षेत्रात चारून शेळ्या घरी आल्यानंतर कुटुंबीयांनी रात्रीचे सुमारास जेवण करून गोठ्यात शेळ्या बांधून झोपी गेले. रात्रीचे सुमारास अचानक बिबट गावात आला व मोहन तुमसरे यांचे गोठ्यात बांधलेल्या शेळीवर हल्ला करून ठार केले व लगतच्या वनक्षेत्रात फस्त केले. गोठ्या सभोवतालच्या पगमार्क वरून बिबट असल्याचे निदान करण्यात आले. घटनेची माहिती क्षेत्र सहाय्यक जे.एम. बघेले, वनरक्षक त्रिवेणी गायधने, सर्पमित्र मयूर गायधने यांनी घटनास्थळी जाऊन मृत शेळीचा पंचनामा केला. त्यात पशू पालकाचे १३ हजार रुपये नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. पशुधन विकास अधिकारी देशमुख मॅडम यांच्या मार्गदर्शनात मृत शेळीचे शवविच्छेदन करून दफन करण्यात आले. या घटनेमुळे पशुपालकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने या बिबटाचा बंदोबस्त करावा. अशी गावकऱ्यांकडून मागणी होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या