राकेश आसोले चित्रा न्युज
छत्रपती संभाजी नगर :-शहरातील रेल्वे स्टेशन परिसरामध्ये दोन इसमांनी एका व्यक्तीला बेदम मारहाण केली आहे. किशोर मस्के नावाचा तरुण रेल्वे स्टेशनवर उतरून घरी जात असताना दोन तरुणांनी त्याला रस्त्यात अडवून खाण्यासाठी पैशांची मागणी केली. किशोर मस्के यांनी पैसे देण्यास नकार दिल्यामुळे दोघांमध्ये बाचाबाची झाली.
किशोर मस्के याने त्याच्या भावाला फोन करून बोलावले. त्याचा भाऊ त्या ठिकाणी आला आणि त्याने दोघांनाही जाब विचारला. त्याचवेळी दोघांनी मिळून किशोर मस्के यांच्या भावाला बेदम मारहाण केली. या घटनेत तो गंभीर जखमी झाला आहे.
मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वेदांतनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांनी तपास सुरू केला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस चक्रे फिरवून काम करत आहेत. जखमी व्यक्तीला त्वरित घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांनी सांगितले की, आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


0 टिप्पण्या