लिंगोजी कदम चित्रा न्युज
नांदेड:-लोकप्रतिनिधींच्या उदासिनतेमुळे तालुक्याला जोडलेले ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांची दयनिय अवस्था बघायला मिळते. ज्या रस्त्याच्या कामाचे बजट मिळाले उद्घाटन केले असे रस्ते खोदून ठेवल्याने त्या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरीकांना नरक यातना सहन कराव्या लागत आहेत. अशीच एक कहानी हिमायतनगर - पळसपूर - डोल्हारी रस्त्याची आहे.
सविस्तर वृत्तानुसार तीन वर्षांपूर्वी हिमायतनगर -पळसपूर - डोल्हारी रस्ता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झाला. हिंगोली लोकसभेचे तात्कालीन खासदार हेमंत पाटील यांनी मोठ्या थाटात उद्घाटन केले. तब्बल ७ कोटी ३० लाख रूपयांचा निधीही मिळाला. कंत्राटदार सिद्दीकी यांनी रस्ता खोदून कामाला सुरूवात केल्याने या रस्त्यावरून जाणाऱ्या नागरीकांना वाटले आता आपल्याला चांगल्या रस्त्यावरून तालुक्याला जाता येणार अशी अपेक्षा बाळगली होती. पण येथील शासनकर्ते लोकप्रतिनिधी, अभियंता यांच्या सहकार्याने कंत्राकदाराने रस्त्याची दयनिय अवस्था करून ठेवल्याने वाहनधारकांसह नागरीकांना आपण यम सदनी जातो कि काय अशी भीती निर्माण झाली आहे. रस्त्यावर टाकलेल्या गिटींमुळे नागरीकांना मनका, कंबरचे त्रास होत आहेत. तसेच अनेक नागरीकांना वाहनाच्या टायरखाली आलेल्या गिटी उडून लागल्याच्या घटनाही घडल्या, अपघातही झाले. आता पावसाच्या सरींना सुरूवात झाल्याने रस्त्यावरील चिखलात दुचाकीसह चारचाकी वाहने अडकून पडत आहेत.
मृत्यूचा सापळा बनलेल्या रस्त्यावरून वाट काढत पळसपुर -डोल्हारी-शिरपल्ली येथील नागरीक, शाळकरी मुलं - मुली तालुक्याच्या ठिकाणी आपली कामे करण्यासाठी येत आहेत. यामध्ये सर्वाधीक छळ शाळेत शिक्षण घेण्यासाठी चिमुकल्या मुला-मुलींचा होत आहे. कोवळ्या वयात त्यांनाही रस्त्याच्या मानसिक तनावासह कंबर, मनके दुखत असल्याने सकाळी उठतांना नाहक त्रास होत आहे. एवढी वाईट दुर्दशा पळसपुर -डोल्हारी-शिरपल्ली रस्त्यावरून ये-जा करण्याऱ्या जनतेची होत असताना स्वत:ला जनतेचे कैवारी मानणारे लोकप्रतिनिधी स्वतःच राजकीय अस्तित्व कसे आबाधीत राहता येईल याकडेच जास्त लक्ष्य देत असल्याचे या भागातील जनता बोलत आहे.
रस्त्याची समस्या सोडवण्यासाठी हदगाव -हिमायतनगर विधानसभेचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या उबरठ्याच्या पायऱ्या झिजवून येथील जनता वैतागली आहे. असेही नागरीक बोलताना दिसून येत आहेत. आता नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना जनतेनी मतदानरूपी आशिर्वादाने देशाच्या सर्वोच्च संसदेत पाठवले. खासदार होऊन एक महिण्याचा कालावधी लोटला परंतु त्यांनाही येथील जनतेची रस्त्याच्या अभावी होत असलेला छळ बघायला अजुन तरी वेळ मिळालेला नाही असेच दिसून येत आहे.
निवडणुकीच्या तोंडावर जनतेला विकासकामांची खैरात वाटणारे लोकप्रतिनिधींनी निवडून आल्यावर जनतेची छळ कशी करतात याचे ताजे उदाहरण पळसपुर -डोल्हारी-शिरपल्ली येथील नागरीकांना विचारल्यावर कळते. त्यांची दुर्दशा बघुन कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल पण गेंड्याची कातडी अंगावर पांघरून घेतलेल्या लोकप्रतिनिधी, कंत्राटदार, अभियंते यांना त्याचे काहीचं मोल वाटत नाही अशी खंत या मार्गावरील जनता बोलताना आढळून येत आहे. मोठ्या अपेक्षेने नुकतेचं लोकसभा निवडणुकीत निवडून दिलेले नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर या रस्त्याची समस्या केव्हा सोडवणार हा येणारा काळचं ठरवणार आहे.


0 टिप्पण्या