सुजित धनवे चित्रा न्युज
जामखेड :- जामखेड चे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक मा. महेश पाटील साहेब यांचा वाढदिवस अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा आरोळेनगर जामखेड येथे शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप व रुक्षारोपण करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
त्यावेळी महापुरुषांना वंदन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. पोलीस निरीक्षक मा. महेश पाटील यांना मुख्याध्यापिका सौं. शोभा कांबळे व इतर शिक्षिका यांनी औषणं करून केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
त्यावेळी मा.महेश पाटील यांना अश्रू अनावर झाले. व मा.महेश पाटील साहेब बोलताना म्हणाले कि,मला आज माझ्या आईची आठवण झाली, माझा वाढदिवस अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा आरोळेनगर येथे साजरा होत आहे हे मि माझे भाग्य समजतो. मि हिथुन पुढे दर रविवारी मुलांसोबत 1,2 तास त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नक्की येईल असे आश्वासन दिले.
आपण सर्व शिक्षक विध्यार्थी घडवत आहात व आम्ही गुन्हेगारी रोखण्यासाठी काम करत आहोत, सर्व समाजातील लोकांना न्याय देण्याचे काम करत आहोत. या ठिकाणी आल्या नंतर मला अगदी खूपच आनंद वाटला. काम करतांना आम्हीपण सर्व साधारणच व्यक्ती असतोत आम्हाला कायद्याच्या चौकटीतच राहून काम करावे लागते.
वरिष्ठान्नी सांगितलेलं असते तुमचा उद्देश, हेतू नेहमी स्वच्छ असला पाहिजे. आपण समाज्याचे ऋणी आहोत. हेवड्या मोठ्या पदावर बसवले आहे. भारतीय राज्यघटनेने जे काही तुम्हाला अधिकार दिलेले आहेत ते चांगल्या कामांसाठी वापरले पाहिजेत. व तळागळातील लोकांना न्याय दिला पाहिजे.
विद्यार्थ्यांनी नेहमी तीन कामे लक्षात ठेवली पाहिजेत चांगला व्यायाम, चांगला अभ्यास, आणि चांगले संस्कार हे तीन कामे तुमचे खूप महत्वाचे आहेत. हे तुम्ही दररोज केले पाहिजेत.
व माझा वाढदिवस अश्या चिमुकल्या मुलांसोबत साजरा केला त्याबद्दल मि आपले आभार मानतो.
त्यावेळी भीमटोला सामाजिक संघटनेचे अध्यक्ष बापूसाहेब गायकवाड, मुख्याध्यापक शोभा कांबळे, शितोळे सर, प्रदीप जाधव सर, होगले सर, महानूर सर, वाघमारे सर, श्रीमती. रांजणे राणी, भुजबळ मोहिनी, अस्वर स्वाती, पारधी मुसूम, पोलीस नाईक अविनाश ढेरे, पत्रकार सुजित धनवे, व सर्व शिक्षक व कर्मचारी, विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 टिप्पण्या