Ticker

6/recent/ticker-posts

बजाज चौक उड्डाण पुलावरील गड्डे तात्काळ बुजवा आसिफ खान यांची बांधकाम विभागाला वारंवार मागणी

अर्पित वाहाणे चित्रा न्यूज 

वर्धा:- शहरातील आचार्य विनोबा भावे उड्डाण पुलावरील गड्डे पावसाळ्या पुर्वी बुजविण्यात यावे या मागणीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागास एम.आय.एम.चे जिल्हा प्रभारी तथा शहराध्यक्ष आसिफ खान यांनी एक महिन्या अगोदर दीले होते.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्याशी सात्यत्याने पाठपुरावा करत असताना, अधिकारी वर्गा कडून तारीख पे तारीख देण्याचे काम करण्यात आले, आज घडीला पावसाच्या पाण्याचे मोठे डबके उड्डाण पुलाच्या मध्य भागी तयार झाले आहे, या गड्ड्या मुळे मोठा अपघात झाल्या शिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाला जग येणार नाही का असा प्रश्न जनतेच्या वतीने विचारला जात आहे.
हजारो लोकांची आवाजावी या पुलावरून दररोज होते, सावंगी मेघे येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे अनेक कर्मचारी तसेच रुग्ण आणि रुग्णवाहीका या पुलावरून धावत असतात. पण झोपेचे सोंग घेतलेल्या निदरस्थ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना याची काही पर्वा नाही असा आरोप आसिफ खान यांनी केला.
सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी अती जलद जर या पुलावर असलेले गड्डे बुजविले नाही, तर एम.आय. एम. जनतेच्या सुरक्षे साठी मोठे आंदोलन उभारेल, याला सर्वस्वी जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता व कर्मचारी राहील.
असा इशारा आसिफ खान यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला पाच तारखेपर्यंत वेळ दिलेली आहे अन्यथा शोले स्टाईल ने पुलाच्या वर चढून तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या