Ticker

6/recent/ticker-posts

💐 || सुमंगल सुप्रभात || 💐‌ 🌞 दिन विशेष 🌞

💐  || सुमंगल सुप्रभात ||  💐
‌          🌞 दिन विशेष  🌞

‌इसवी सन २०२४ - ७ जुलै 
‌शालिवाहन शक १९४६, विक्रम संवत 
२०८०
‌भा. रा. १६ आषाढ १९४६
युगाब्द ५१२६       
संवत्सर नाम : क्रोधी
अयन : दक्षिणायण 
ऋतू : ग्रीष्म 
मास: आषाढ 
पक्ष: शुक्ल 
तिथी: द्वितीया (२९.००) ~ तृतीया                                     वार : रविवार 
नक्षत्र : पुष्य (३०.००) ~ आश्लेषा 
राशी : कर्क 

*मनोरथ द्वितीया* 
*शुक्रोदय पश्चिमेस*
*जगन्नाथ रथयात्रा*

*प.पू.भक्तराज महाराज जन्मोत्सव,* इंदूर.

*जागतिक चॉकलेट दिन*
*जागतिक क्षमा दिवस*

१४५६: मृत्यूच्या २५ वर्षांनंतर जोन ऑफ आर्कला निर्दोष ठरवले.
१५४३ : फ्रेन्च सैन्याने लक्झेंबर्गचा ताबा घेतला.
१७६३: बंगालचे नवाब मीर जाफर याला पुन्हा बंगालच्या गादीवर बसविण्यात आलं.
१७९९ : रणजीतसिंहाच्या सैन्याने लाहोरला वेढा घातला.
१८५४: कावसजी दावर यांनी दि बॉम्बे स्पिनिंग ॲन्ड विव्हिंग मिल ही पहिली कापड गिरणी मुंबईत सुरू केली. मुंबई ही कापड उद्योगाची राजधानी असली तरी भारतातील पहिली कापडगिरणी मात्र भडोच येथे तर महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी नागपूरला सुरू झाली होती.
१८५४: बॉम्बे स्पिनिंग अँड वेअविंग मिलचि स्थापना.
१८९६ : मुंबईच्या फोर्ट भागातील एस्प्लनेड मॅन्शन या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील वॉटसन हॉटेलमधे ऑगस्ते व लुई या ल्युनिअर बंधूंनी भारतात पहिल्यांदाच चित्रपट दाखवला.
१८९८ : अमेरिकेने हवाई बळकावले. हवाई बेटांनी अमेरिकेचे सार्वभौमत्व मान्य केले. मात्र, त्यांना अमेरिकेचे राज्य हा दर्जा मिळण्यासाठी पुढे ६० वर्षे वाट पाहावी लागली.
१९१० : इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे आणि खंडेराव चिंतामण मेहेंदळे यांनी पुणे येथे भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना केली.
१९४८: दामोदर घाटी निगम ची स्थापना.
१९८५ : विम्बल्डन पुरूष एकेरीचे विजेतेपद १७ व्या वर्षी मिळवणारा बोरिस बेकर हा सर्वात तरुण खेळाडू बनला.
१९९८ : इन्डिपेन्डन्स चषक तिरंगी क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेविरुद्ध खेळताना सचिन तेंडुलकरने वेस्ट इंडिजच्या डेसमंड हेन्सच्या एकदिवसीय सामन्यातील १७ शतकांची बरोबरी केली. तसेच एकदिवसीय सामन्यातील ७००० धावांचा टप्पा पार केला.
२००५ : दहशतवाद्यांनी लंडनमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणले, ५६ ठार.

जन्मदिवस
१६५६: शीख धर्माचे आठवे गुरु, गुरू हर क्रिशन (मृत्यू: ३० मार्च १६६४)
१८८३: प्रसिद्ध भारतीय हिंदी साहित्यकार व भारतीय हिंदी, संस्कृत, प्राकृत आणि पाली भाषेचे लेखक व अभ्यासक चंद्रधर शर्मा गुलेरी 
१९१४ : अनिल विश्वास, प्रतिभासंपन्न संगीतकार. 
१९४८: चित्रपट रंगभूमीवरील अभिनेत्री पद्मा चव्हाण, स्त्रीसौंदर्याचा एक अनोखा नमुना म्हणून ख्याती असलेल्या पद्मा चव्हाणांच्या नाटकांच्या जाहिरातींत त्यांच्या नावा आधी ‘मादक सौंदर्याचा अ‍ॅटम बॉम्ब’ असे छापले जात असे. 
१९६२: गायिका पद्मजा फेणाणी 
१९७३: भारतीय गायक-गीतकार आणि दिग्दर्शक कैलाश खेर 
१९७४ : महेश भूपती, टेनिसपटू.
१९८१ : महेंद्रसिंग धोनी,  क्रिकेट खेळाडू व कप्तान.

मृत्यूदिन
१९१२ : सत्यभामाबाई टिळक (तापीबाई), लोकमान्य टिळकांच्या पत्नी.
१९३०: स्कॉटिश डॉक्टर शेरलॉक होम्स या गुप्तहेर कथांचे लेखक सर आर्थर कॉनन डॉइल
१९९२ : डॉ. सखाराम गंगाधर तथा स. गं. मालशे, मराठी वाङमयाचे ज्येष्ठ अभ्यासक.
१९९९: भारतातील सर्वोच्च शौर्य पराक्रम पुरस्कार परमवीर चक्र पुरस्कार सन्मानित माजी भारतीय सैन्य दल अधिकारी कॅप्टन विक्रम बत्रा 
२०११: भारतीय हिंदी आणि मराठी चित्रपट व दूरदर्शन मालिका कलाकार रसिका जोशी.
२०२१: अभिनेता युसुफ खान तथा दिलीप कुमार याचे वयाच्या ९८ व्या वर्षी निधन

        *।। दास-वाणी ।।*

कांही पदार्थ विसरोन गेला । 
कां जे सिकला तें विसरला । 
स्वप्नदु:खें घाबिरा जाला । 
या नांव भ्रम  ।। 

दुश्चिन्हें अथवा अपशकून । 
मिथ्या वार्तेने भंगे मन । 
वचके पदार्थ देखोन । 
यां नाव भ्रम  ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : १०/०६/१९-२० 

एखादी वस्तु आपल्या जवळच असते, 
पण नेमकी कुठे ठेवली हेच आठवत नाही.
पाठ केलेल असते पण ऐनवेळी विस्मरण होते.
भीतीदायक स्वप्नामधे प्रचंड दु:ख अनुभवले. त्याची धास्ती जागेपणीही घेतली आणि घाबरून गेला. हे सगळे भ्रम आहेत.

कावळा खिडकीत बसला, मांजर आडवे गेले की अपशकून झाला या कल्पनेनेचे गाळण उडाली.
बातमी खोटी आहे हे कळूनही मनाला अस्वस्थता येते.
एका पदार्थावर दुसऱ्याचा भास.
दोरी आहे पण साप असेल काय अशी भीती वाटणे. हा रज्जूसर्प भ्रम होय.

जे नाही ते आहे वाटणे. आहे ते नाही असे वाटणे. आहे ते वेगळेच भासणे हे भ्रमाचे प्रकार आहेत.
हे मिथ्या जग 'आहे' असे वाटणे हा ही 
अस्तित्वाचा भ्रमच आहे.

*भ्रमनिरूपण समास*

*संकलक : सुधीर देशपांडे (आबा)*

 🙏 💐💐💐💐💐 🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या