संजय देशमुख चित्रा न्युज
अमरावती:- जिल्हा मध्यवर्ती कारागृहात क्रिकेट बॉलमध्ये बारूद भरलेली फटाका सदृश वस्तू आढळली आहे. रात्री 8 वाजता सुमारास जेलच्या भिंतीवरून या वस्तू फेकल्या गेल्या होत्या, ज्यामुळे स्फोट झाला. या घटनेमुळे कारागृहात मोठी खळबळ उडाली आहे.
स्फोटाच्या आवाजानंतर अमरावती पोलिसांनी तातडीने कारागृहात सर्च ऑपरेशन सुरु केले. अमरावती पोलीस आयुक्त नवीचंद्र रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचा फौजफाटा कारागृहात दाखल झाला. बॉम्ब शोधक आणि नाशक पथकानेही जेल परिसरात सर्च मोहीम राबवली.
जेलर कीर्ती चिंतामणी यांनी सांगितले की, "जेलमध्ये बॉम्ब सदृश वस्तू आढळल्याने कैद्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे." सापडलेले साहित्य फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.
या घटनेमुळे अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात सुरक्षा वाढवण्याची गरज अधोरेखित झाली आहे. अधिक तपास सुरु असून, परिस्थिती नियंत्रणात आहे.


0 टिप्पण्या