शाळेच्या भिंतीवर झाड कोसळले
विद्युत खांबांचे आणि झाडांचे नुकसान
रवि भोंगाने चित्रा न्युज प्रतिनिधी
साकोली: तालुक्यातील वीर्सी गावात आज दुपारी ३ च्या दरम्यान चक्री वादळाने थैमान घातले. आज गुरुपौर्णिमेनिमित्त सकाळची शाळा असल्याने विद्यार्थीही बचावले अन्यथा गावातील नागरिकांना फार मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले असते. दुपारी ३ वाजताच्या सुमारास गावात अचानक चक्री वादळाने थैमान घातले. शाळेच्या भिंतीवर झाड पडल्यानंतर गावातील मुख्य रस्त्यावरील ७ ते ८ मोठी झाडे कोसळली. इतकेच नव्हे तर विद्युत खांब सुद्धा या चक्रीवादळात आपली सुरक्षा करू शकले नाहीत. त्यामुळे गावात वीज सेवा दुपारपासून खंडित आहे. रात्रीपर्यंत वीज सेवा सुरळीत होण्याची शक्यता नाही अशी माहिती समोर येत आहे. गुरुपौर्णिमा असल्याने शाळेला सुट्टी होती. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक, विद्यार्थी आणि पालकवर्ग घरी होते तर महिलावर्ग रोवणीच्या कामाला प्रारंभ झाल्याने शेतामध्ये रोवणीचे काम करीत होते. सध्या गावात चक्री वादळामुळे जीवित हानी झाली नसली तरी गावातील नैसर्गिक संपत्तीला नुकसान पोहचले आहे. यासह गाव आणि शेतशिवार मिळून एकूण ४० ते ५० विद्युत खांब कोसळल्याची माहिती आहे. ठिकठिकाणी झाडे कोसळल्याने गावातील वाहतूक ठप्प झाली असून वीरसी सातलवाडा रस्ता पूर्णपणे ठप्प झालेला आहे. गावातील दोन घरांवर झाडे कोसळण्याची माहिती आहे. गावात झाडे आणि विद्युत खांब यांचे अधिक नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.
______________________________________________
गावात दुपारपासून चक्री वादळाने आपली हजेरी लावल्याने गावातील काही काळ जनजीवन ठप्प झालेले होते. गुरुपौर्णिमेचा दिवस असल्याने नागरिक आपल्या घरीच होते. त्यामुळे जीवित हानीला सामोरे जावे लागले नाही. परंतु गावातील वीज पुरवठा यंत्रणेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. सावली देणारी मोठी मोठी झाडे या चक्री वादळात कोसळल्याने पर्यावरणाचे अतोनात नुकसान झालेले आहे. गावातील विजेचे खांब मोठ्या प्रमाणात कोसळल्याने विद्युत पुरवठा खंडित आहे. त्यामुळे गावातील नागरिकांची गैरसोय झालेली आहे. रस्त्या रस्त्यावर झाडे पडल्याने वाहतूक ठप्प झालेली असून वाहतूक करणाऱ्या नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
लीलाधर सोनवणे.
सरपंच, वीर्सी.
_______________________________________________
ही नैसर्गिक आपत्ती आहे. त्यामुळे नागरिकांना या आपत्तीला सामोरे जावे लागेल. नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाण्याची प्रत्येक नागरिकांची मानसिकता तयार असली पाहिजे. एवढ्या मोठ्या चक्री वादळामुळे जीवित हानी झाली नाही हे आमच्या गावाचे सुदैव. नुकसानी तयारी गावकऱ्यांना ठेवावी लागेल आणि या गंभीर समस्येला समोर जावे लागेल. वीज खांब पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे वीज पुरवठा विभागाने ही सेवा लवकरात लवकर द्यावी आणि वाहतूक विभागाने रस्त्यावरील वाहतूक लवकरात लवकर सुरळीत करावी ही विनंती.
टेकचंद शहारे.
नागरिक, वीर्सी.


0 टिप्पण्या