शेवगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांची आग्रही मागणी.
रुपाली मेश्राम चित्रा न्युज
शेवगाव : वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांनी शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवडणूक लढवावी अशी आग्रही मागणी शेवगाव तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केली.
शेवगाव येथील ममता लॉन्स मध्ये आयोजित वंचित बहुजन आघाडीच्या निर्धार बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस संगीता ढवळे, अरुण झांबरे, सुरेश खंडागळे, सागर गरुड, विशाल इंगळे, ज्ञानेश्वर म्हस्के, महादेव तुतारे, अजिनाथ आव्हाड, राजू उगलमुगले, अशोक गायकवाड, विठ्ठल जगदाळे, अन्सार कुरेशी, राजू पठाण, विष्णू वीर, नितीन जाधव, बाप्पासाहेब उल्हुरे, अंकुश कडमिंचे, लक्ष्मण मोरे, बबलू बोरुडे, सुनील साळवे, रोहिनी ताई ठोबे, चंदा खंडागळे, बाळासाहेब लहासे, विठ्ठल मगर, गणेश बोरुडे, अरुण खरचन, कल्याण भागवत, अनिस शेख, सचिन बेळगे, संतोष ढाकणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रा. किसन चव्हाण ही आमची पावर बँक आहे. शेवगाव - पाथर्डी मतदारसंघातील गोरगरीब, दलित, मुस्लिम, आदिवासी, भटके विमुक्त, गरीब मराठा, ओबीसी समाजाचे प्रश्न घेऊन ते सतत रस्त्यावरची लढाई करतात. गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी आगामी विधान सभा निवडणूक लढली पाहिजे. शेवगाव - पाथर्डी तालुक्यातील कारखानदारांची मक्तेदारी मोडीत काढून ही निवडणूक आपण मोठ्या ताकदीने लढवली पाहिजे. कारण प्रस्थापित पुढारी, कारखानदार व शिक्षण सम्राट यांना गोरगरिबांच्या प्रश्नांची कुठलीही जाण नाही आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याची देखील त्यांची इच्छा नाही. म्हणूनच जनतेचे अनेक महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत ते सोडवण्यासाठी आपल्याला प्रा. किसन चव्हाण यांना विधानसभेत पाठवायचे असा निर्धार कार्यकर्त्यांनी यावेळी केला.
गेली ५ वर्षे किसन चव्हाण यांनी घोंगडी बैठकीच्या माध्यमातून गावोगाव जाऊन लोकांचे प्रश्न समजून घेऊन ते सातत्याने सोडवत आहेत. अख्खा मतदार संघ त्यांनी पिंजून काढला आहे. नोकरशाही कडून होणारी जनतेची पिळवणूक रस्त्यावरती आंदोलने करून मोडून काढली आहेत. त्यामुळे सर्व शासकीय कार्यालयात त्यांचा दबदबा आहे. त्यामुळे लोकांचे प्रश्न सुटत आहेत. मतदार संघात प्रा. चव्हाण यांची ओळख जात, धर्म न बघता कोणत्याही वेळी धावत येऊन मदत करणारा रस्त्यावरचा कार्यकर्ता अशी आहे. त्यामुळे ही निवडणूक त्यांनीच लढविली पाहिजे असा जोरकस आग्रह कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. कारखानदारांना आपल्या संस्था टिकविण्यासाठी आमदार व्हायचं आहे. कारखानदारांकडे धन शक्ती आहे तर प्रा. चव्हाण यांच्याकडे जनशक्ती आहे. प्रा. चव्हाण यांना जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी विधानसभेत पाठविण्यासाठी सर्वांनी ताकदीनिशी तन,मन, धनाने त्यांच्या पाठीशी उभे राहू अशी प्रतिज्ञाही कार्यकर्त्यांनी केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तालुका सरचिटणीस तथा ताजनापुरचे अशोक गायकवाड व सचिन बेळगे व भाजपा अल्पसंख्याक सेल चे तालुकाध्यक्ष अनिस भाई शेख यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला.
प्यारेलाल भाई शेख यांनी प्रास्ताविक केले. गणेश साळवे यांनी सूत्रसंचालन केले तर प्रताप भालेराव यांनी आभार मानले. या बैठकीस शेवगाव तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 टिप्पण्या