Ticker

6/recent/ticker-posts

३५ वर्षाचा अनुभव घेऊन बाबुराव कदम कोहळिकर ला २०२४मध्ये गुलाल कसा लागेल हे विचार करणे काळाची गरज आहे संभाराव लांडगे .


लिंगोजी कदम चित्रा न्युज 
नांदेड :- हदगाव ,हिमायतनगर विधानसभेचे लोकनेते तथा शिंदे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुरावजी कदम कोहळिकर यांच्या येणाऱ्या २०२४ मधील विधानसभेच्या विषयावर आज हदगाव येथे चिंतन बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये सांगोपांग चर्चा शिंदे सेनेच्या सर्व स्तरातून आलेल्या पदाधिकारी मतदार बांधवांनी केली आहे त्यावेळी व्यासपीठावरून संभाराव लांडगे बोलत होते की गेल्या ३५वर्षाचा अनुभव बघता बाबुराव कदम यांना गुलाल कसा लागेल याच्यावर आपल्याला विचार करणे काळाची गरज असल्याचे त्यांनी त्यांच्या मनोगतातून सांगितले आहे .
यावेळी हदगाव हिमायतनगर विधानसभेतील कार्यकर्त्यांनी आपापले मनोगत व्यक्त करत आपल्या विधानसभेतील अनुभवांची खैरात या ठिकाणी चिंतन बैठकीमध्ये मांडण्यात आली आहे पुढे बोलताना म्हणाले की गेल्या ३५ वर्षांमध्ये कोणतेही पद नसताना हदगाव हिमायतनगर विधानसभेच्या क्षेत्रांमध्ये एवढा मोठा निधी खेचून आणणारा हा पहिला संघर्ष योद्धा बाबुरावजी कदम हे असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतातून आवर्जून सांगितले आहे .यावेळी उपस्थित तांना मार्गदर्शन करताना म्हणाले की आज पर्यंत चा इतिहास पाहता असा शिवसैनिका बाळासाहेब ठाकरे चा सच्चा कार्यकर्ता आपल्या विधानसभेला लाभला यावेळी आपल्याला त्यांना गुलाल कसा लागेल याची काळजी घेणे हि सर्वांची जबाबदारी आहे असेही ते म्हणाले .
यावेळी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुरावजी कदम कोहळिकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण या योजनेचे फॉर्म भरण्यासाठी आम्ही हदगाव हिमायतनगर विधानसभेच्या सर्व बूथ वाईज कार्यकर्त्यांना फॉर्म भरण्याचे सांगत आहोत आणि हादगाव हिमायतनगर विधानसभेमध्ये एक लाख फार्म उपलब्ध करून दिले असल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले आहे या वेळी   हदगाव हिमायतनगर विधानसभेतिल शिंदे सेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या