Ticker

6/recent/ticker-posts

लोयन्स क्लब तळेगाव तर्फे 25 वें मोतिया बिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले


 सुयोग ठाकरे तालुका प्रतिनिधी धामणगाव रेल्वे अमरावती

धामणगाव रेल्वे  :-तळेगाव दशा येथे लायन्स क्लब तर्फे वर्षातून दोन वेळा मोफत नेत्ररोग व मोतिया बिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात येत असते.त्या नुसार या वर्षी चे दुसरे हे शिबिर रविवार दिनांक 4ऑगस्ट रोजी संप्पण झाले.या वेळी या शिबिरात 180 नेत्र रुग्णांची तपासणी करण्यात आली.या पैकी 25 रुग्णांची मोतिया बिंदू शस्त्रक्रिया करिता निवड करण्यात आली.लगेचच त्यांना सेवाग्राम येथील रुग्ण वाहिकेने नेण्यात आले.उर्वरित नेत्र रुग्णांना मेडिसिन चे वाटप करण्यात आले.

   तपासणी व रुग्णांच्या निवडी करिता सेवाग्राम मेडिकल कॉलेज च्या तज्ञ डॉक्टर यांनी केली. 
    या क्लब चे हे 25 वे शिबिर होते.या 25 शिबिरात आजपर्यंत 1205नेत्र रुग्णांचे मोतिया बिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहे.या सर्वच शिबिरात तपासणी,जाणे येणे, मेदिसिन,राहणे,जेवण, ऑपरेशन इत्यादी सर्व मोफत करण्यात आले.
    हे शिबिर यशस्वी करण्यासाठी लॉ.विनोद देशमुख,लॉ.अरविंद बानुदे,लॉ. भरत लोहिया,लॉ.विजय तलमले ,लॉ.नरेंद्र रामावत लॉ. राजुभाऊ मोहोद,लॉ.गजानन मलवार,लॉ. ए. यम.शहा सर,लॉ.अर्जुन लोहिया,लॉ.शीतल लोहिया सुरेश चूटे,विलास अनकर,आदींनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या