Ticker

6/recent/ticker-posts

50 फुटांचा रोड झाला 10 फुटांचा ..

हाळी-हंडरगुळीत वाहतुक नियमांच्या आय चा घो सा.बां.खाते म्हणते अतिक्रमणधारकांना नोटीस देणार 

 तर पोलीस खाते म्हणते रविवारी दंडात्मक कार्यवाही करणार .. !!
 


विठ्ठल पाटील लातूर

लातूर:- उदगीर शहरानंतर तालुक्यात सर्वात मोठे व नांदेड-बिदर या राज्यमार्गा लगत बाजार पेठेचे गाव असलेल्या हाळी-हंडरगुळी येथे मेन मार्केटसह राज्य मार्गावर वाहन चालवीने महा कठीण बनले आहे.कारण या गावात कारवाही करणारी यंञणाच नाही. म्हणुन बहूतांश वाहधारक वाहतूक नियमांच्या "आय चा घो" असे म्हणत नियमांचे उल्लंघन करताना व गाड्या बेशिस्तीत पार्क केलेल्या दिसतात.या मुळे येथे वाहतूक नियमांचे तीन तेरा ! व बारा वाजले तरीही यावर कार्यवाही का ? होत नाही.असा प्रश्न उपस्थित होत आहे.रविवारी या बाबत पोलीस प्रशासनातर्फे दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे.असे जमादार संजय दळवे म्हणाले.तसेच हा रोड 50 फुटांचा आहे.माञ,या रोडवर वाढलेले मोठमोठे अतिक्रमण आणी बेशिस्तित  रोडटच थांबणा-या फळां- च्या तसेच खाजगी गाड्या.यांच्यामुळे हा रोड 10 फुटांचाच दिसत आहे.व या बाबत फोनवरुन संपर्क केलो असता अतिक्रमणधारकांना तत्काळ नोटीसा देणार,माञ बेशिस्तित उभा असलेल्या गाड्यांवर कार्यवाहीची जबाबदारी ही पोलिसांची आहे.तसेच या बाबतीत स्थानिक प्रशासन म्हणुन ग्रा.पं.चा कांही "रोल" नाही का.तेंव्हा *नो पार्किंग व नो हाॅकर्स झोन*असे बोर्ड ग्रा.पं.ने लावावेत.असे एम.एम. पाटील अभियंता सा.बां.खाते उदगीर यांनी सांगितले.
उदगीर शहरानंतर सर्वात मोठे तसेच बाजारपेठेचे व राज्यमार्गावरचे गाव म्हणुन हाळी-हंडरगुळी प्रसिध्द आहे. यामुळे येथे परिसरातील 50 ते 60 गावचे नागरिक व वाहनधारक रोज हजारोंच्या संख्येत ये-जा करतात.तर स्थानिक व बाहेरील कांही वाहनवाले आपल्या ताब्यातील गाड्या रोडवर बेशिस्तीत पार्क करुन नियमांचे बारा वाजवतात.दरम्यान येथे कार्यवाही करणारी यंञणाच अस्तित्वात नाही. म्हणुन या रोडवर अतिक्रमण करणे यांच्यासह फळांचे व खाजगी गाड्या बेशिस्तीत पार्क करण्याची "स्पर्धा"  लागल्यासारखे चीञ दिसते.या गावी वाहतूक नियमांचे उघडउघड 3 तेरा वाजल्याचे दिसते.दरम्यान वाढलेल्या अतिक्रमणाकडे व 12 वाजलेल्या वाहतुकीकडे अन्य धंद्यावर बे-धडक कारवाही करणा-या पोलीसांनी लक्ष द्यावे अशी मागणी व्यापारी व जनता करीत आहेत.*50 फुटांचा राज्य मार्ग झाला 10 फुटांचा*
हाळी-हंडरगुळीतुन गेलेला नांदेड ते बिदर हा राज्य मार्ग हा 50 फुटांचा . माञ,या रोडवर वाढलेले अतिक्रमण व बेशिस्तीत थांबलेल्या  फळांसह खाजगी गाड्या.यांच्यामुळे हा मार्ग 10 फुटांचा आहे की काय?असा प्रश्न उपस्थित होतो.या रोडवर वाढलेले अतिक्रमण व हे कमी म्हणुन की काय फळांसह खाजगी गाड्या कुठे ही बेशिस्तीत थांबतात.यामुळे वाहनां सह पदचा-यासांठी केवळ 10 फुट शिल्लक रोडवरुन जीवमुठीत धरुन वावरावे लागते.व याचा ञास सामान्य जनतेला हकनाक सोसावा लागतोय. *पोलीस व सा.बां.विभाग कडक अण् बे-धडक कार्यवाही करणार*!  येथे वाढलेले अतिक्रमण तसेच बेशिस्तीत थांबणा-या फळगाड्यांसह खाजगी गाड्या यांच्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे.म्हणुन या सर्वांवर संबंधित प्रशासनाने लातुर चे तत्कालीन *i.p.s सिंघम पोलीस अधिकारी निकेतन कदम*  यांच्या सारखी धाडसी कार्यवाही करण्याची मागणी जोर धरत आहे.याबाबत 25 रोज रविवार या दिवशी पोलीसांद्वारे *कडक* कारवाहीची *धडक* मोहीम राबविणार आहोत.असे पो.हे. काॅन्सटेबल संजय दळवेंनी सांगीतले. तर कांबळे नामक सहका-याद्वारे अतिक्रमणधारकांना लवकरच नोटीसा देणार.माञ,स्थानिक 2 ही ग्रा.पं. चा याबद्दल कांहीच *रोल* नाही का, तसेच "नो पार्कींग व नो हाॅकर्स झोन" असे बोर्ड दोन्ही ग्रा.पं.ने जागोजागी लावावेत.असे अभियंता एम.एम.पाटील (सा.बां.खाते उदगीर) यांनी सांगीतले आहे.
एकंदरीत आता खरोखरच कार्यवाही होणार का , बोलाचाच .. !  याकडे जनता नजर ठेवुन आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या