पंकज पाटील चित्रा न्युज
जळगाव :- अमळनेर-जानेवारी ते मे 2024 या चालू वर्षात अवकाळी पावसाच्या नुकसानीमुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना डीबीटी प्रणालीद्वारे आर्थिक मदत मिळणे सुरू झाले असुन यासाठी जळगाव जिल्ह्यात 91 कोटीचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी दिली. अमळनेर मतदारसंघातील अमळनेर व पारोळा तालुक्यात सर्वाधिक मोठे नुकसान झाले असल्याने येथील शेतकरी बांधवाना जिल्ह्यात सर्वाधिक 25 कोटींच्या आसपास मदत मिळणे सुरू झाले आहे. मदत व पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर ही मदत दिली जात असून जळगाव जिल्ह्यात 15 तालुक्यांना मदत मिळणे सुरू झाले आहे. जळगाव जिल्ह्यात 32 हजार 355.3 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी 55 हजार 716 शेतकरी बांधवाना एकूण 91 कोटी 38 लक्ष, 47 हजार 134 एवढी मदत दिली जात आहे. पैसे थेट खात्यावर पडू लागल्याने जिल्ह्यातील शेतकरी बांधवामध्ये समाधान व्यक्त होत आहे. सदर मदतीबद्दल शेतकरी बांधवानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.जिल्ह्यात तालुकानिहाय मिळणारी मदत पुढीलप्रमाणे,,,जळगाव तालुका शेतकरी संख्या 113, 42.50 (हे. आर.), 12920 (हे. आर.), विजेत क्षेत्र 12680, जामनेर तालुका शेतकरी संख्या 3434, बाधित क्षेत्र 1797.47 (आरहे. आर. 52138180), सावळ. तालुका शेतकरी संख्या 17, बाधित क्षेत्र 3.4. , 2010 11998, बोदवड तालुका तालुका तालुका 3532, बाधित क्षेत्र 3556.47 (हे.आर.), 98007280, मुक्त नगर तालुका लोकसंख्या 7033, बाधित क्षेत्र 4476.99 (हेआर), 141171620, एरंड क्षेत्र हे. आर, 397664, धरणगाव तालुका शेतकरी संख्या 297, बाधित क्षेत्र 113.29 (आर.आर.), 3075480, पारोळा तालुका लोकसंख्या 831, बाधित क्षेत्र 5117.58 (हे.आर.), 137084200, यावल तालुका, बाधित क्षेत्र 490. आर 8 क्षेत्र 15552220, रावेर तालुका लोकसंख्या 1950, बाधित क्षेत्र 1148.34 (हे.आर.), बाधित क्षेत्र 41340240, अमळनेर तालुका तालुका तालुका 8881, बाधित क्षेत्र 41.59, बाधित क्षेत्र 155522 (2019), बाधित क्षेत्र 1148.34 (हे.आर.), शेतकरी संख्या 9001, बाधित 4411.59 (आर.आर.), 120136920, चोपडा तालुका तालुका 9001, बाधित क्षेत्र 5634.40 (हे.आर.), 15324.40 (आर.आर.), 153244800, पाचोरा गांव जिल्ह्यातील शेतकरी संख्या 2415, बाध क्षेत्र 685.02, 2001 क्षेत्र, 215 1776, बाधित क्षेत्र 790.14 (हे.आर), 2452760, चाळीस गाव तालुका शेतकरी संख्या 7556, बाधित क्षेत्र 4026.95 (हे.आर), निधी 109249200.


0 टिप्पण्या