सोमनाथ खंडागळे सोलापूर
सोलापूर :- ता. माढा येथील श्री गणपती फार्मसी महाविद्यालयाच्या बी. फार्मसीच्या प्रथम वर्षाच्या द्वितीय सत्राच्या परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठ लोणेरे, रायगड तर्फे घेण्यात आलेल्या बी. फार्मसी परीक्षेत प्रथम वर्षातील अनिकेत गायकवाड (८.५५) यांनी प्रथम क्रमांक, मुस्कान मुलाणी (८.५२) यांनी द्वितीय क्रमांक तर, खुशिया शेख (८.४१) यांनी तृतीय क्रमांक मिळविला. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव डॉ. आर. डी. बेंदगुडे, अध्यक्ष ॲड विजयराव हिरवे, उपाध्यक्ष बाबा येडगे, प्राचार्या डॉ. रूपाली बेंदगुडे यांनी अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांना यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या. डॉ. रुपाली बंदगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रा. अक्षय भेंकी, प्रा. शिवराज ढगे, प्रा. गंगा गोरे, प्रा. कोमल साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभले.


0 टिप्पण्या