Ticker

6/recent/ticker-posts

D.Y.S.P . मनीष कल्याणकर यांची 15 दिवसात दुसरी कार्यवाही .

हाळी येथील जुगार अड्ड्यावर छापा

60 हजारांचा मुद्देमाल जप्त ; जुगार अड्डा मालकासह आठजणांवर गुन्हा.

विठ्ठल पाटील लातूर

 लातूर :-उदगीर-अहमदपुर या राज्यमार्गास लागुन असलेल्या एका पञी शेड मध्ये *कल्याण* नावाचा मटका जुगार बिनधास्तपणे खेळणा-या व खेळवीत असलेल्या मालकासह आठ व्यक्तींना अहमदपुर व वाढवणा पोलीसांनी दि. 23 रोजी संयुक्तरित्या छापा टाकुण रंगेहाथ पकडले.यावेळी 59920/ ह. रुपयांचा मुद्देमालही जप्त केला आहे..
विशेष म्हणजे दि.6/8/24 रोजी याच अड्ड्यात डिवायएसपी मनीष कल्याणकर यांचे पथकाने हाळीत अहमदपुरहून येऊन धाड टाकली होती.तेंव्हाही 7 इसमांवर गुन्हा दाखल करुन हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. तरीही मेनरोडवर व वर्दळीच्या जागी हा अड्डा अजुनही चालतोच कसा व कुणाच्या आर्शीवादाने ? असा सवाल हाळीकर जनतेतुन प्रशासनाला विचारला जात आहे.तसेच D.y.s.p. डीवायएसपी मनीष एम. कल्याणकर हे पथकासह अहमदपुर येथून येऊन हाळीत अवैध धंद्यावर धाडीवर धाडी टाकत असल्याने तत्कालीन i.p.s. आयपीएस तथा " सिंघम " पोलीस अधिकारी निकेतन कदम यांच्या *दे-दणादण व धडाकेबाज* कामगिरीची आठवण हाळीकरांना येत आहे.या प्रकरणी वाढवणा (बू) पोलीस ठाण्यात एस.एम.शेटकार (पो.ह.780 अ.पुर) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन जुगार अड्डा "मुखीया" सह 8 जणांवर मुंजुका अन्वये गुन्हा नोंद झाला आहे.
तर डीवायएसपी मनीष कल्याणकर यांचा वाढला *दरारा*अवैध धंदेवाले कापतात "थरथरा" असे म्हणणे चूक ठरणार नाही..
कलीम मैनोद्दीन बागवान रा.हाळी
हणमंत शिवराज सुकणे रा.सुकणी
गणेश व्यंकट कांबळे रा.चिमाचीवाडी
पिराजी गणपती वाघमारे टाकळगाव 
श्रीनिवासरामदासवाघमारेटाकळगाव
किशन तुकाराम राठोड हटकरवाडी
गिरीधर रामराव कांबळे रा.हाळी व अड्डा मालक जावेद पठाण रा.हाळी या सर्वांवर महाराष्ट्र जुगार कायदा {मुंजुका} अन्वये गुन्हा दाखल झाला.  उदगीर ते अहमदपुर जाणा-या राज्य मार्गालगतच्या इंडिया मोबाईल शाॅपी लगतच्या बोळातील पञी शेड मध्ये ईसम नामे गिरीधर रामराव कांबळे रा हाळी ता.उदगीर हा कल्याण नावाचा मटका जुगार हा वरील आरोपींकडून पैसे घेऊन चिठ्ठ्यांवर मटका जुगार स्व:ताच्या व अड्डा मालक जावेद पठाण रा.हाळी याच्या फायद्यासाठी खेळत व खेळवीत असताना मटका जुगार घेतलेल्या चिठ्ठ्यांसह चार मोबाईल {किंमत 51000} व नगदी रोख 8920 रु.यांचेसह मिळुन आला तसेच सदरचा जुगार अड्डा हा मालक जावेद पठाण याचा असल्याचे गिरी - धर रामराव कांबळे यांनी कबूल केले म्हणुन जावेद पठाण याचेवर ही मुंबई जुगार कायदा 12 (अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे..
अहमदपुर विभागाचे पोलीस उपाधिक्षक मनीष कल्याणकर यांचे आदेशान्वये एस.एम.शेटकार,पोउप निरीक्षक. तुकडे, चालक सपोउपनी. बिरादार, पोहेकाॅ. रेचवाडे,पोना.गुट्टे हे सर्व अहमदपुर आणी पोहेकाॅ संजय दळवे, पोकाॅ. सोनकांबळे हे वाढवणा पोलीस यांनी संयुक्तरित्या ही "धडाकेबाज" रेड केली आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या