• आ. नाना पटोले यांचे प्रयत्न सार्थकी
कालिदास खोब्रागडे, चित्रा न्युज
भंडारा :- काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष तथा साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना पटोले यांचे प्रयत्नाने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये लेखाशीर्ष २५१५, १२३८ अंतर्गत लाखनी तालुक्यातील २६ गावांत २ कोटी ८ लक्ष रुपयाची सभागृह बांधकाम, सौंदरीकरण, शेतकरी भवन, रस्ता मजबुतीकरण इत्यादी विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत. त्यात दिघोरी/नान्होरी येथे बुद्ध विहाराजवळ सभागृह व सौंदरीकरण करणे १० लाख, सावरी येथे शिव मंदिराजवळ सभागृह बांधकाम करणे ८ लाख, ढीवरखेडा येथे तोडाघाटाजवळ सभागृह बांधकाम करणे ७ लाख, गोंडेगाव येथे बुद्ध विहाराजवळ सभागृह बांधकाम ७ लाख, झरप येथे बुद्ध विहाराजवळ सभागृह बांधकाम १० लाख, चान्ना येथे ढीवर समाज परिसरात सभागृह बांधकाम ७ लाख, लाखोरी येथे मातामाय मंदिराजवळ सभागृह बांधकाम ५ लाख, पाथरी येथे बुधाजी मेश्राम ते अमिषा राइस मिल पर्यंत रस्ता मजबुतीकरण १५ लाख, धानला येथे गावअंतर्गत सभागृह बांधकाम ७ लाख, पेंढरी येथे हनुमान मंदीराजवळ सभागृह बांधकाम ८ लाख, सामेवाडा येथे हनुमान मंदिराजवळ सभागृह बांधकाम ७ लाख, आलेसुर येथे गाव अंतर्गत सभागृह ७ लाख, पोहरा येथे ग्रामपंचायत जवळील हनुमान मंदिराला सभागृह १० लाख, कन्हाळगाव येथे बौद्ध विहाराजवळ सभागृह बांधकाम ५ लाख, लाखनी येथे सिपेवाडा रोड वरील लक्ष्मीनारायण मंदिराजवळ सभागृह बांधकाम १० लाख, गराडा येथे गावअंतर्गत सभागृह बांधकाम १० लाख, वाकल येथे गावअंतर्गत सभागृह बांधकाम १० लाख, रेंगेपार/कोठा येथे शेतकरी भवन बांधकाम १० लाख, धाबेटेकडी येथे बिरसा मुंडा पुतळ्या जवळ सभागृह बांधकाम ७ लाख, शिवणी येथे बौद्ध विहाराजवळ विस्तारीकरण व सौंदरिकरण ७ लाख, गोंडसावरी येथे गोवारी समाजाच्या जागेजवळ सभागृह बांधकाम ७ लाख, मोरगाव येथे गावअंतर्गत सभागृह ७ लाख, सिंदीपार येथे राजाभोज मंदिराजवळ सभागृह १० लाख, खूनारी येथे शिवतीर्थ मंदिराजवळ सभागृह बांधकाम व सौंदरिकरण १० लाख, लाखनी विठ्ठल रुखमाई मंदिराजवळ सभागृह बांधकाम व सौंदरिकरण ७ लाख, किटाडी येथे गावअंतर्गत सभागृह ७ लाख इत्यादी विकास कामांचा समावेश आहे.


0 टिप्पण्या