नोंदणी फी व्यतिरिक्त केली जाते अतिरिक्त रकमेची मागणी
कालिदास खोब्रागडे, चित्रा न्युज
भंडारा:- ग्रामीण परिसरातील शेतकऱ्यांची शेतीचे व्यवहारासंबंधात दस्त नोंदणी तालुका स्तरावर व्हावी. या करिता दुय्यम निबंधक कार्यालयाची स्थापना करण्यात आली. या कार्यालयातील अधिकाऱ्याच्या वरदहस्ताने एक खासगी संगणक परिचालक दस्त नोंदणी फिस व्यतिरिक्त अतिरिक्त रकमेची मागणी करतो. न दिल्यास कोणती तरी त्रुटी काढून दस्त नोंदणी केली जात नाही. या संगणक परीचालाकास कोणत्याही बह्यास्त संस्थेने नेमनुक केली नसली तरी हा संगणक परिचालक दुय्यम निबंधक कार्यालयात कसा काय दस्त नोंदणीसाठी मदत करतो. याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून या संगणक परिचालकास काम करण्यास मज्जाव करणे गरजेचे झाले आहे.
साकोली व लाखांदूर तालुक्याचे विभाजन करून लाखनी तालुक्याची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर २००८ मध्ये दुय्यम निबंधक कार्यालयास सुरुवात करण्यात आली. या कार्यालयात शेतजमिनी व प्लॉट ची खरेदी विक्री नोंदणी, विवाह नोंदणी, शेतजमीन आणि घरांचे मूल्यांकन करणे, मृत्युपत्र नोंदणी या शिवाय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळोवेळी सांगितलेली कामे करणे हे या कार्यालयाचे काम आहे. लाखनी दुय्यम निबंधक कार्यालयात दुय्यम निबंधक, १ कनिष्ठ लिपिक, एक परिचर अशी पदे मंजूर असून बह्यास्थ संस्थेद्वारे एका संगणक परीचालकाची नियुक्ती करण्यात आली. या व्यतिरिक्त १ खासगी संगणक परिचालक कामास असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. या संगणक परिचालकाकडून दस्त नोंदणीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना नोंदणी फी व्यतिरिक्त अतिरिक्त रकमेची मागणी केली जात असते. त्यामुळे नागरिकांची लूट होत आहे. कोणतीही दस्त नोंदणी करताना नागरिकांना मुद्रांक शुल्क नोंदणी शुल्क व दस्त हाताळणी शुल्क भरावे लागते. मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क हे बँकेत भरावे लागत असून त्याची चालन बनवून दिले जाते तर दस्त हाताळणी शुल्क २०रुपये प्रति पेज याप्रमाणे आकारले जाते. मात्र या सगळ्या शुल्कापेक्षा अतिरिक्त शुल्क अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून आकारले जात असून ते अतिरिक्त शुल्क कशाचे असा प्रश्न नागरिकांना पडला असून ते शुल्क दिल्याशिवाय कोणतेही दस्त नोंदणी होत नाही. हे मात्र विशेष. यासाठी नोंदणी फी च्या २ ते ३ पट रक्कम उकळली जाते. या प्रकारात दुय्यम निबंधकही सहभागी असल्याशिवाय हा खासगी संगणक परिचालक एवढी मोठी हिम्मत करू शकणार नाही. काम अळू नये या करिता नाईलाजाने मागणी केलेली अतिरिक्त रक्क शेतकऱ्यांना द्यावी लागते. या प्रकाराने दुय्यम निबंधक कार्यालयात दलालांचा सुळसुळाट झाला म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
*कार्यालयात खाजगी दलालांचा वावर*
लाखनी दुय्यम निबंध कार्यालयात कोणतेही काम करण्यासाठी खाजगी दलाल कार्यालयाने नियुक्त केले असून त्या दलालांमार्फत कामे केली जात आहेत ते दलाल सक्रिय असून अतिरिक्त मोठ्या प्रमाणात दस्त नोंदणीसाठी आलेल्या पक्षकारांना नागरिकांना मागत असून ते दिल्याशिवाय तुमचे कोणतेही काम होणार नाही अशी तंबी सुद्धा हे दलाल देत असल्याने नाईलाजांने नागरिकांना ते मागणी केलेली अतिरिक्त रक्कम द्यावी लागत आहे.
*खाजगी इसम संगणक ऑपरेटर*
लाखनी येथील दुय्यम निबंधक कार्यालयात संगणक ऑपरेटर खाजगी इसम असल्याचे नागरिक सांगत असून दस्त नोंदणीसाठी आलेल्या नागरिकांना आधी पैसे नंतर काम असा व्यवहार करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे असून या कार्यालयात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार खोपावला आहे त्यामुळे दस्त नोंदणीसाठी अतिरिक्त पैसे मागणारा तो ऑपरेटर कोण असा प्रश्न नागरिकांना पडला असून या संगणक ऑपरेटरची नियुक्ती पुणे येथील मुख्य कार्यालयातून केली असल्याचे दुय्यम निबंधक पाटील यांनी सांगितले. प्रत्यक्षात बाह्य संगणकाची काम करण्यासाठी एक एजन्सी शासनाकडून नियुक्त करून त्या एजन्सी मार्फत संगणक ऑपरेटर पाठविले जात असले तरी याची कल्पना दुय्यम निबंधकांना नसल्याने केवळ अतिरिक्त शुल्क घेण्याचीच माहिती या दुय्यम निबंधकांना आहे काय असा प्रश्न पडला आहे.


0 टिप्पण्या