सुजित धनवे चित्रा न्युज
जामखेड :- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची नुतन कार्यकारणी जाहीर झाली असून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी समाजहीत डोळ्यासमोर ठेवून निर्भिड निःपक्ष वास्तववादी लिखणी करावी पत्रकारांना तिथे गरज पडेल तिथे आरपीआयच्या त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल असे आरपीआयचे (आठवले गट) सुनिल साळवे यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या जिल्हाउपाध्यक्षपदी लियाकत शेख. जिल्हा कार्यकारणी सदस्यपदी प्रकाश खंडागळे. दिपक देवमाने. तर जामखेड तालुकाध्यक्षपदी ओंकार दळवी उपाध्यक्षपदी समिरभाई शेख सचिवपदी संदेश हजारे. कार्याध्यक्षपदी सचिन अटकरे यांच्या निवडी झाल्या यानिमित्ताने नान्नज येथे आरपीआयच्या वतीने सत्कार समारंभ आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.


0 टिप्पण्या