सुजित धनवे चित्रा न्युज
जामखेड :- दलित. वंचित. गोरगरीबांचे कैवारी व प्रशासनाला जागेवर आणण्यासाठी पत्रकारांनी आपल्या लेखणीचा उपयोग करावा निर्भिड लेखाण करण्यार्या पत्रकारांच्या पाठिशी भिमटोला संघटना कायम आहे असे अश्वासन भिमटोला संघटनेचे अध्यक्ष बापूसाहेब गायकवाड यांनी केले .
शहरातील भिमटोला संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गायकवाड यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या जिल्हाउपाध्यक्षपदी लियाकत शेख. जिल्हा कार्यकारणी सदस्यपदी प्रकाश खंडागळे. जामखेड तालुकाध्यक्षपदी ओंकार दळवी उपाध्यक्षपदी समिरभाई शेख कार्याध्यक्षपदी सचिन अटकरे यांच्या निवडी झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला यावेळी संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गायकवाड जोंगेद्र थोरात मा, सरपंच ग,पाटोदा. पत्रकार सुजित धनवे. मनोज आंधाळे पि के सिद्धेश्वर दत्ता जगताप. रमजान मदारी. अमर चाऊस. भुंजग दळवी. प्रवीण करडकर आदी उपस्थित होते.


0 टिप्पण्या