Ticker

6/recent/ticker-posts

विद्यार्थ्याचा अस्वछतेमुळे मृत्यू, अखिल बौद्ध समाज पुणे आक्रमक, व्यवस्थापकावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा करण्याची पोलीस प्रशासनाकडे मागणी.

 

मिलिंद गायकवाड चित्रा न्यूज 


पुणे: - पुण्यातील घोले रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह येथे गेल्या चार दिवसांत दोन विद्यार्थ्यांचा दूषित पाणी आणि घाणीमुळे, अस्वछतेमुळे आजारी पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली असून, सिद्धांत खैरे आणि वेदांत सोनोने असे मृत्यू झालेल्या विद्यार्थी यांची नावे आहेत. या घटनेची माहिती मिळताच अखिल बौद्ध समाज पुणे मधील सर्व बौद्ध बांधव, भगिनी, भिमसैनिक यांनी संबंधित वसतीगृह गाठले व सर्व परिस्थिती जाणून घेतली या वेळी संबधित अधिकारी यांना बौद्ध बांधवांनी धारेवर धरत जाब विचारला आणि वसतीगृहाची पाहणी केली, विद्यार्थ्यांच्या समस्या व प्रश्न जाणून घेण्यात आले.

शिवाजी नगर पोलीस स्टेशन येथे जाऊन संबधित अधिकारी जित पवार याच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा येत्या 24 तासांत दाखल करण्यात यावा अन्यथा अखिल बौद्ध समाज पुणे च्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या