🌞 दिन विशेष 🌞
इसवी सन २०२४ - २५ ऑगस्ट
शालिवाहन शक १९४६, विक्रम संवत २०८०
भा. रा. ४ भाद्रपद १९४६
युगाब्द ५१२६
संवत्सर नाम : क्रोधी
अयन : दक्षिणायण
ऋतू : वर्षा
मास: श्रावण
पक्ष: कृष्ण
तिथी: सप्तमी (२७.४०) ~ अष्टमी
वार: रविवार
नक्षत्र: भरणी (१६.४५) ~ कृत्तिका
राशी: मेष (२२.३०) ~ वृषभ
*आदित्य पूजन*
*भानु सप्तमी*
२००७: हैदराबादमध्ये अतिरेक्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटांत ४३ ठार.
२००३: मुंबईत अतिरेक्यांनी घडवून, आणलेल्या दोन कार-बॉम्बस्फोटांमध्ये ५२ ठार.
१९९८:एनसायकक्लोपिडिया ब्रिटानिका या जगप्रसिद्ध विश्वकोशाच्या संपादकीय आवृत्तीच्या आयातीवर भारत सरकारने बंदी घातली. या आवृत्तीत भारताच्या सीमा चुकीच्या दाखवल्यामुळे तसेच जम्मू काश्मीर राज्याविषयी चुकीची माहिती दिल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
१९९७:दक्षिण कन्नडा (South Canara) जिल्ह्याचे विभाजन करुन ’उडुपी’ हा स्वतंत्र जिल्हा निर्माण करण्यात आला.
१९९१:लिनस ट्रोव्हाल्डस याने ’लिनक्स’ (Linux) या संगणक प्रणालीची पहिली आवृत्ती प्रकाशित केली.
१९९१:एअरबस ए-३२० ने पहिले उड्डाण केले.
१९९१: बेलारुसने आपण (सोविएत युनियनपासुन) स्वतंत्र असल्याचे जाहीर केले.
१९५७: जयपूर येथील दिवंगत महाराजा सवाई मान सिंग द्वितीय यांच्या नेतृत्वाखाली भारतीय पोलो संघाने फ्रांस मध्ये आयोजित विश्वकप जिंकला.
१९४१: अशोक पत्की – राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय संगीत दिग्दर्शक आणि संगीतकार तसंच, “मिले सूर मेरा तुम्हारा”, “पूरब से सूर्य उगा” या गीताचे रचनाकार
१९१९:जगातील पहिली प्रवासी विमानसेवा लंडन ते पॅरिस या शहरांदरम्यान सुरू झाली.
१६०९:गॅलेलिओ गॅलिली याने जगातील पहिल्या दुर्बिणीचे प्रात्यक्षिक दाखवले.
जन्मदिवस :
१९६२:डॉ. तस्लिमा नसरीन – बांगलादेशी स्त्रीमुक्तीवादी लेखिका
१९३६: इमेज इंस्टिट्यूट ऑफतयरा टेक्नॉलॉजी अँड ण्ड मॅनेजमेंट चे संस्थापक गिरिधारीलाल केडिया
१९३०:शॉन कॉनरी – ’जेम्स बॉन्ड’च्या भूमिकांमुळे गाजलेला स्कॉटिश अभिनेता व निर्माता
१९२३:गंगाधर गाडगीळ – साहित्यिक, समीक्षक व अर्थतज्ञ, ५६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
मृत्यूदिन :
२०१२:नील आर्मस्ट्राँग – चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव
२००१ : डॉ. वसंत दिगंबर तथा व. दि. कुलकर्णी – संतसाहित्याचे गाढे अभ्यासक व समीक्षक. त्यांचे ’धुळाक्षरातून मुळाक्षराकडे’ हे आत्मचरित्र वेगळ्या स्वरुपामुळे गाजले.
२०००:कार्ल बार्क्स – सुमारे तीन दशके ’डोनाल्ड डक’ची रुपरेखा चितारुन त्याला जगभर प्रचंड लोकप्रियता मिळवून देणारे हास्यचित्रकार
१८६७:मायकेल फॅरेडे – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ
१८२२:विल्यम हर्षेल – जर्मन/ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ व संगीतकार. १७८१ मध्ये त्याने युरेनस ग्रहाचा शोध लावला.
१८१९:जेम्स वॉट – स्कॉटिश संशोधक व यंत्र अभियंता
*।। दास-वाणी ।।*
येक प्राणी अंतरिक्ष असती ।
तेंही नाहीं देखिली क्षिती ।
वरीच्यावरी उडोन जाती ।
पक्ष फुटल्यानंतरें ।।
नाना खेचरें आणि भूचरें ।
नाना वनचरें आणि जळचरें ।
चौऱ्यासि योनीप्रकारें ।
कोण जाणे ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध : १५/०८/१९-२०
काही प्राणी म्हणजे जीव हे आकाशातच असतात. घरटे झाडावर असते. अंडी घरटयामधेच घालतात.
अंडयातून बाहेर पडलेले छोटे पक्षी पंख फुटल्यावर परस्पर आकाशातच वरचेवर उडून जातात. तोपर्यंत त्यांना क्षिती म्हणजे जमीन दिसलेलीही नसते.
खेचर म्हणजे आकाशांत विहार करणारे असंख्य प्रकारचे वेगवेगळया आकाराचे लहान मोठे पक्षी. भूचर म्हणजे जमिनीवर किंवा जंगलात राहाणारे पाळीव आणि वन्यपशू, पाण्यामधे राहणारे विविध प्रकारचे मासे आणि सर्प. अशा चौऱ्यांशी लक्ष प्राणी योनींची समग्र आणि सूक्ष्म जीवशास्त्रीय माहिती कोणाला बरे ठाऊक असेल ?
*सूक्ष्मजीवनिरूपण समास.*
*संकलक : सुधीर देशपांडे (आबा)*
🙏 💐💐💐💐 💐 🙏


0 टिप्पण्या